Join us

'सम्राट पृथ्वीराज'ला बसला पान मसाला जाहिरातीचा फटका? दिग्दर्शकाचा अक्षय कुमारवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:14 PM

Akshay Kumar's 'Samrat Prithviraj' : अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. जवळपास २०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ८० कोटीदेखील कमावू शकला नाही.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय(Akshay Kumar)चा सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. जवळपास २०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ८० कोटीदेखील कमावू शकला नाही. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर आता यासाठी कोण जबाबदार आहे, यावरून सध्या वाद सुरू आहे. दरम्यान आता दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी (Chandraprakash Dwivedi) यांचे विधान समोर आले आहे. 

दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, सुपरस्टारच्या वादामुळे (पान मसाला जाहिरातीचाही समावेश) या चित्रपटाच्या बिझनेसवर परिणाम झाला आहे. त्यांच्यानुसार अक्षय कुमारच्या पूर्वीच्या वर्तणूकीमुळे आणि पब्लिक कमेंट्समुळे कदाचित लोक त्याच्यावर नाराज झाले आणि याच कारणामुळे सम्राट पृथ्वीराज वाईटरित्या बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

ते पुढे म्हणाले की, असे नाही की तुम्हाला अभिनेत्याला नाकारण्याचा अधिकार नाही. मात्र अक्षय कुमार इंडस्ट्रीत गेल्या ३० वर्षांपासून काम करतो आहे. तर तुम्हाला त्याची क्षमता माहित असेल. सम्राट पृथ्वीराजच्या भूमिकेत अक्षय कुमारने सर्वोत्कृष्ट काम केले आहे. तो असा पहिला अभिनेता नाही, ज्याचे परफॉर्मन्स लोकांना आवडलं नाही. मात्र त्याला पृथ्वीराज यांच्या भूमिकेत त्याच्या अभिनयासाठी बायकॉट करण्यात काही सेंस नाही. ज्या गोष्टी अक्षयने भूतकाळात केल्या आहेत जसे की पान मसालाची जाहिरात प्रमोट करणे किंवा शंकरावर दुधाचा अभिषेक करु नये, असे म्हणणे. यासाठी सिनेमाला बायकॉट करण्यामध्ये काही सेन्स नाही. कारण या गोष्टींचा आमच्या चित्रपटांशी काहीच संबंध नाही. 

टॅग्स :अक्षय कुमार