१९९८ साली प्रदर्शित झालेला शाहरूख खान, काजोल व राणी मुखर्जी यांच्या अभिनयानं सजलेला चित्रपट 'कुछ कुछ होता है'ला नुकतेच २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे. या चित्रपटात तिघांव्यतिरिक्त शाहरूखची मुलगी अंजलीनेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. या चित्रपटात चुलबुली अंजलीची भूमिका सना सईदने साकारली होती. २२ सप्टेंबर, १९८८ साली मुंबईत जन्माला आलेली सना सईद आता खूप बदलली आहे.
'कुछ कुछ होता है'मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदचं खूप कौतूक झालं. या चित्रपटानंतर ती २००० साली 'बादल' व 'हर दिल जो प्यार करेगा' चित्रपटात झळकली होती. या चित्रपटानंतर सना बराच काळ रुपेरी पडद्यावर दिसली नाही.
तसेच ती 'झलक दिखला जा ६', 'झलक दिखला जा ७', 'नच बलिए ७' आणि 'झलक दिखना जा ९' या रिएलिटी शोमध्येदेखील दिसली होती.
तिचे ६ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.