सध्या अनेक सिनेमे रि रिलीज होत आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तर रोमँटिक सिनेमांच्या प्रदर्शनाची रांगच लागली आहे. त्यातच एक म्हणजे 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam). हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा तरुणांच्या फेवरिट लिस्टमध्ये असतोच. २०१६ साली रिलीज झाला तेव्हा सिनेमाने फार काही चांगला बिझनेस केला नव्हता. मात्र नंतर सिनेमाची खूप माऊथ पब्लिसिटी झाली होती. आता सिनेमा रि रिलीज झाल्यानंतर तेव्हाची एकूण कमाई आज एका दिवसात झाली आहे. दरम्यान या सिनेमात हर्षवर्धन राणेच्या जागी एक वेगळाच अभिनेता दिसणार होता.
'सनम तेरी कसम' सिनेमात हर्षवर्धन राणेने 'इंदर' ही भूमिका साकारली. त्याच्या जागी दुसऱ्याच एका अभिनेत्याला कास्ट करण्यात आलं होतं. ना विकी कौशल आणि ना हर्षवर्धन मग कोणत्या अभिनेत्याची सिनेमासाठी निवड झाली होती माहितीये का? दिग्दर्शक विनय सप्रू म्हणाले, "आम्ही एहान भट्ट ला शॉर्टलिस्ट केलं होतं. त्याने तीन महिने वर्कशॉपही केलं. मात्र तोवर हर्षवर्धन आणि विकीचीही ऑडिशन बाकी होती. आम्ही दुसऱ्या दिवशी फोटोशूट करणार होतो. तेव्हाच हर्षवर्धन आला आणि त्याने खूप छान परफॉर्म केलं. ऑडिशनमध्ये त्याने लिफ्टमध्ये शर्ट काढण्याचा सीन केला."
कोण आहे एहान भट्ट?
एहान भट ३२ वर्षांचा आहे. '९९ साँग्स' हा त्याचा पहिला सिनेमा. यासाठी त्याला बेस्ट डेब्यूचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला. यानंतर तो स्टार फिश, दंगे आणि ब्रोकन बट ब्युटिफूल या सीरिजमध्येही दिसला.