'सनम तेरी कसम' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला बॉलिवूडचा सिनेमा प्रचंड गाजला. मात्र त्याला बॉक्स ऑफिसवर हवं तसं यश मिळालं नव्हतं. या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्री मावर होकेन आणि अभिनेता हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत होते. 'सनम तेरी कसम' सिनेमातील त्यांची जोडी हिट ठरली होती. त्यांच्या अभिनयाचंही कौतुक झालं होतं. आता ९ वर्षांनी पुन्हा हा सिनेमा व्हॅलेटाइन वीकमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. आतादेखील या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
व्हॅलेटाइन वीकच्या सुरुवातीलाच ७ फेब्रुवारीला 'सनम तेरी कसम' सिनेमा थिएटरमध्ये री-रिलीज करण्यात आला. तीनच दिवसांत सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'सनम तेरी कसम'ने पहिल्या दिवशी ४.२५ कोटींचा गल्ला जमवला. तर शनिवारी ५.२५ कोटींची कमाई केली. रविवारी या सिनेमाने ६ कोटींचा गल्ला जमवला. तीनच दिवसांत 'सनम तेरी कसम'ने बॉक्स ऑफिसवर १५.५० कोटींचा बिजनेस केला आहे.
'सनम तेरी कसम' हिंदी सिनेमाच्या इतिहासात सर्वात लोकप्रिय अशी लव्हस्टोरी आहे. २०१६ साली आलेला हा रोमँटिक हिंदी सिनेमा आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. दरम्यान, 'सनम तेरी कसम' मध्ये हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेनसह मनीष चौधरी, मुरली शर्मा, अनुराग सिन्हा, विजय राज, सुदेश बेरी, कमल आदिब हे अनुभवी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.