Join us

Sandeep Nahar Suicide: संदीप नाहरने आत्महत्येआधी केलेल्या FB पोस्टमध्ये काय म्हटलंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 1:33 AM

SSR's Co-star in 'MS Dhoni' Sandeep Nahar Suicide : मृत्यूपूर्वी संदीपने फेसबुकवर भावनिक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. त्यानुसार संदीपने आत्महत्या केली, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देसंदीप नाहर याने 'एम एस धोनी: अनटोल्ड स्टोरी' (M.S. Dhoni: The Untold Story), 'केसरी' (Kesri) अशा चित्रपटांत, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या.

मुंबई : अभिनेता संदीप नाहर (Sandeep Nahar) याने गोरेगावमधील आपल्या घरात कथित आत्महत्या केल्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. संदीप नाहर याने 'एम एस धोनी: अनटोल्ड स्टोरी' (M.S. Dhoni: The Untold Story), 'केसरी' (Kesri) अशा चित्रपटांत, तसेच अनेक टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. 

मृत्यूपूर्वी संदीपने फेसबुकवर भावनिक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. त्यानुसार संदीपने आत्महत्या केली, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. मात्र संदीपने खरेच आत्महत्या केली की ती हत्या आहे, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काय म्हटलंय आत्महत्येआधी केलेल्या FB पोस्टमध्ये?"आता जगण्याचीच इच्छा उरलेली नाही. जीवनात अनेक सुखदु:ख पाहिली. पण, सध्याच्या घडीला मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे योग्य नाही मला माहिती आहे. मलाही जगायचे होते. पण जिथं सेल्फ रिस्पेक्ट नाही, समाधान नाही तिथे जगून काय फायदा. माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शरमा यांनी मला कधीच समजून घेतले नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको हायपर आहे. तिच्या आणि माझ्या पर्सनॅलिटीमध्ये खूप फरक आहे. रोजचीच भांडणं ऐकण्याची ताकद माझ्यात नाही. यामध्ये तिची काहीही चूक नाही, तिला सर्वकाही सुरळीत वाटतं. पण माझ्यासाठी हे सामान्य नाही", असे संदीपने म्हटले आहे.

याचबरोबर, "मी कित्येक वर्षांपासून मुंबईत आहे. मी वाईट वेळही पाहिली पण कधी खचलो नाही. बाऊन्सर होतो, डबिंग केलं, जीम ट्रेनरही होतो. वन रूम किचनमध्ये सहा जण राहायचो. स्ट्रगल करत होतो पण समाधानी होतो. आज मी काही मिळवलं आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. दोन वर्षांपासून आयुष्य पूर्ण बदललं आहे आणि हे सर्वकाही मी कुणासोबत शेअरही करू शकत नाही. जगाला वाटतं आमचं सर्व किती चांगलं सुरू आहे. कारण ते आमचे सोशल पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सर्वकाही खोटं असतं. जगाला दाखवायला. इमेज चांगली राहावी यासाठी हे टाकतो पण खरं एकदम विरुद्ध आहे. आमचं अजिबात पटत नाही," असेही संदीपने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

याशिवाय, "मी आत्महत्या खूप आधीच केली असती. पण मी स्वतःला वेळ दिली. सर्वकाही ठिक होईल, स्वतःला प्रोत्साहीत केलं. पण दररोज क्लेश, त्यामध्ये मी अडकलो आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता मला हे पाऊल आनंदानं उचलावं लागेल. इथं या आयुष्यात नरक मिळालं कदाचित इथून गेल्यानंतर तिथलं आयुष्य कसं असेल मला माहिती नाही. पण मला इतकं माहिती आहे, मी त्याचा सामना करेन. एक विनंती आहे, मी गेल्यानंतर कांचनला काहीही बोलू नका, फक्त तिच्या मेंदूचा उपचार जरूर करून घ्या", असं संदीपने फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे. 

टॅग्स :संदीप नहारबॉलिवूड