‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाचे सोशल मीडिया यूजर्स कौतुक करत आहेत. या चित्रपटात रश्मिकाने रणबीर कपूरच्या पत्नी गीतांजलीची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की गीतांजलीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती परिणीती चोप्रा होती. आता चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी परिणीतीच्या जागी रश्मिकाला ही भूमिका का देण्यात आली याचा खुलासा केला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाले, 'शक्य असल्यास मला माफ करा. खरंतर तो माझाच दोष आहे. मी दीड वर्षांपूर्वी परिणीतीला कास्ट केले होते, पण काही कारणांमुळे मी परिणीतीमध्ये गीतांजली दिसली नाही. काही पात्रे काही कलाकारांना शोभत नाहीत. मी ऑडिशनवर कधीच विश्वास ठेवत नाही. मला तिचा अभिनय पहिल्या दिवसापासूनच आवडतो. मला तिला कबीर सिंगमध्ये प्रितीच्या भूमिकेत कास्ट करायचे होते, पण तसे झाले नाही. मी यासाठी परिणीतीचीही माफी मागितली'.
'अॅनिमल' हा पिता-पुत्राचा बंध दाखवणारा चित्रपट आहे. यात अनिल कपूर आणि रणबीर कपूर बाप लेकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यातील रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओलच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.