Join us

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट, नेटकरी म्हणाले, "आता प्रतीक्षा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 10:09 AM

'ॲनिमल' सिनेमानंतर त्याच्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. या सिनेमाच्या सीक्वलसाठी प्रेक्षकही आतुर होते.

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमातील गाणी, डायलॉग आणि काही सीन्सची प्रचंड चर्चा रंगली आहे. अशातच 'ॲनिमल'च्या दुसऱ्या भागासाठीही प्रेक्षक उत्सुक आहेत. 'ॲनिमल' सिनेमानंतर त्याच्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. या सिनेमाच्या सीक्वलसाठी प्रेक्षकही आतुर होते. पण, त्याबाबत चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.

पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडलेल्या आणि ८०० कोटींची दमदार कमाई केलेल्या 'ॲनिमल'च्या क्लायमॅक्समध्ये त्याच्या सीक्वलबाबत हिंट देण्यात आली होती. त्यामुळे 'ॲनिमल पार्क' या सिनेमाच्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. आता याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. टी सीरिजच्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. "ही विश्वासामुळे निर्माण झाली, क्रिएटिव्ह स्वातंत्र्याने परीपूर्ण आणि कधीही न तुटणारी पार्टनरशिप आहे. निर्माते भूषण कुमार आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा त्यांच्या प्रभास स्पिरीट, 'ॲनिमल पार्क' आणि अल्लू अर्जुन सागा याचे अनावरण करत आहेत. कबीर सिंग आणि 'ॲनिमल'च्या सक्सेसप्रमाणे हे सिनेमेही हिट होतील," असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'ॲनिमल'च्या सीक्वलच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. आता या सिनेमाची अधिकृतपणे घोषणा झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. "'ॲनिमल पार्क' लेट्स गो", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "आता प्रतीक्षा करू शकत नाही", असं म्हटलं आहे. 'ॲनिमल'मध्ये रणबीर कपूरबरोबररश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या सीक्वलसाठी काही कलाकारांना विचारण्यात आल्याच्याही चर्चा सुरू आहेत. 

टॅग्स :रणबीर कपूररश्मिका मंदानासिनेमा