नवी दिल्ली - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. काही निकटवर्तियांनी तर त्यांचा घटस्फोट झाल्याचेही सांगितले आहे. मात्र सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी त्यांच्यातील नात्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच त्याबाबत कुठलेही विधानही केलेले नाही. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह हा २०१० मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. मात्र शोएब मलिकपूर्वी सानिया मिर्झा ही बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती.
त्या अभिनेत्याचं नाव आहे शाहीद कपूर. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याच्याशी विवाह करण्यापूर्वी सानिया मिर्झा ही शाहीद कपूरला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र ही चर्चा केवळ अफवा असल्याचे समोर आले होते.
सानिया मिर्झाने कॉफी विथ करण कार्यक्रमात शाहीद कपूरसोबतच्या नात्याबाबत मोकळेपणाने चर्चा केली होती. तुला कुठल्या हिंदी फिल्म अभिनेत्याने अॅप्रोच केलं नाही का? असं विचारलं असता सानिया मिर्झा म्हणाली होती की, माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही. त्यानंतर करणने विचारलं की, शाहीद कपूरबाबत काही अफवा उठल्या होत्या, त्या खऱ्या होत्या का, त्यावर सानियाने सांगितले की मला हे आठवत नाही. ही फार जुनी गोष्ट आहे. असं कधीही घडलेलं नाही.
२०१० मध्ये शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांनी विवाह केल्यानंतर १८ मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्याचं नाव इजहान मिर्झा मलिक असं ठेवण्यात आलं होतं. सध्या सानिया दुबईमध्ये आहे तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये राहत आहे. त्यातच घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान, सानिया मिर्झाची पर्सनल लाईफ चर्चेत आली आहे.