सुशांत सिंग राजपूत एक गुणी अभिनेता आहे, यात शंकाचं नाही. आज सुशांत आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो़ त्याच्यासोबत डेब्यु म्हणूनच लहान-सहान गोष्ट नाही. दिशा पटनीने सुशांतसोबतचं डेब्यू केला होता. लवकरच सैफ अलीची मुलगी सारा अली खानही सुशांतसोबतचं डेब्यू करतेय. साराशिवाय आणखी एक अभिनेत्री सुशांतसोबत डेब्यू करणार आहे. तिचे नाव आहे, संजना सांघी. पण तूर्तास तरी हा डेब्यू वांद्यात सापडला आहे. होय, शूटींगदरम्यानचे सुशांतचे वागणे संजनाला फार रूचलेले दिसत नाही. सूत्रांचे मानाल तर यामुळे चित्रपटाचे शूटींग रखडले आहे.
‘किज्जी और मनय’ या चित्रपटातून संजना सांघी बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. पण शुटींगदरम्यान सुशांत संजनासोबत अतिजवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला आणि सुशांतच्या या एक्स्ट्रा फ्रेंडली वागण्याने संजना अस्वस्थ झाली. ही गोष्ट तिने आपल्या पालकांना सांगितली. मग काय, तुला मनापासून वाटत नाही, तोपर्यंत सेटवर परत जायचे नाही, असे संजनाच्या पालकांनी तिला सांगितले. यानंतर संजना सेटवर फिरकलीचं नाही. साहजिकचं हिरोईनचं नाही म्हट्ल्यावर चित्रपटाचे शूटींग थांबले.कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांना याबाबत विचारले असता, त्यांनी यावर बोलणे टाळले. सुशांतनेही या प्रश्नावर बोलणे टाळले. पण चित्रपटाशी संबंधित प्रवक्त्याने मात्र सेटवर असे काहीही घडले नसल्याचा खुलासा केला. शूटींग थांबले असल्याचाही या प्रवक्त्याने इन्कार केला.‘किज्जी और मनय’ हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या ‘फाल्ट इन स्टार्स’ या सुपरहिट हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाद्वारे मुकेश छाबडा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.