अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला महिन्याभरापेक्षा जास्त काळ लोटला आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान या चित्रपटातील त्याची सहकलाकार अभिनेत्री संजना सांघीचा मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत संजनाने सुशांतवर करण्यात आलेल्या #MeToo आरोपांवरील चुप्पी तोडली आहे.
२०१८ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही वृत्तांनुसार संजनाने सुशांतवर #MeToo अंतर्गत आरोप केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यादरम्यानच त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरेणही सुरु होते.
पण, या सगळ्यामध्ये संजनाच्या नावे चुकीची माहिती देत त्यात सुशांतवर गंभीर आरोप करण्यात आले होते. जे संजनाने फेटाळून लावले आहेत.