संजय दत्त पुन्हा पोलिसांच्या फेऱ्यात; बजावले नॉन बेलेबल वॉरंट!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2017 3:39 PM
काही महिन्यांपूर्वीच शिक्षा भोगून सामान्य जीवन जगत असलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा पोलिसांच्या फेºयात अडकण्याची शक्यता आहे. न्यूज ...
काही महिन्यांपूर्वीच शिक्षा भोगून सामान्य जीवन जगत असलेला अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा पोलिसांच्या फेºयात अडकण्याची शक्यता आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या माहितीनुसार पंधरा वर्षांपूर्वी शकील नुरानी याला धमकाविल्याबद्दल संजय दत्तला कोर्टाने नॉन बेलेबल वॉरंट बजावले आहे. त्यामुळे संजूबाबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या अंधेरी मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने हे वॉरंट बजावले असून, यापूर्वी कोर्टाने संजय दत्तला समन्स दिले होते. २००२ मध्ये चित्रपट निर्माता शकील नुरानी याने त्याच्या ‘जान की बाजी’ या चित्रपटासाठी ५० लाख रुपये देऊन संजयला साइन केले होते. त्यानंतर नुरानीने आरोप केला होता की, संजय दत्तने हा चित्रपट अर्ध्यातच सोडल्याने माझे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच प्रकरणाशी संबंधित संजयवर आरोप आहे की, जेव्हा शकीलने संजयला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संजूबाबाने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर अंडरवर्ल्डकडूनही शकील नुरानी याला धमकाविण्यात आले होते. आता या प्रकरणाचा तपास त्वरित मार्गी लागावा याकरिता न्यायालयाने संजय दत्तला हे वॉरंट बजावले आहे. यावेळी संजय दत्त यानेदेखील शकील नुरानी यांच्यावर परस्परविरोधी आरोप केले होते. तो म्हणाला की, नुरानी याचे अंडलवर्ल्ड कनेक्शन असल्यानेच मी हा चित्रपट सोडला होता. त्यावेळी मला अंडरवर्ल्डकडून धमक्याही आल्या होत्या. मात्र नुरानी यांनी संजयचे सर्व आरोप फेटाळून लावत संजय दत्तच अंडरवर्ल्डचा एक भाग असल्याचे म्हणत तो त्यांना भेटण्यासाठी विदेशात जात असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी नुरानी यांनी सुरु वातील ‘द इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन’ (IMPPA)कडेही संजय दत्तविरोधात तक्र ार केली होती. यावर संजय दत्तने १५ दिवसांच्या आत नुरानी यांना ३० दिवसांच्या शुटिंगसाठी तारखा द्याव्यात किंवा १.५३ कोटी रु पयांची भरपाई करावी, असा आदेश दिला होता. यानंतर संजय दत्तच्या सांगण्यावरुन कराची आणि दुबई येथून धमकीचे कॉल आल्याचा आरोपही नुरानी यांनी केला होता. दरम्यान, या खटल्यात महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून संजय दत्तला जामीन मिळाला होता. त्यामुळे IMPPA आदेश संजय दत्तला लागू करावा यासाठी नुरानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संजय दत्तच्या पाली हिल येथील फ्लॅटवर टाच आणून रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाकडून संजय दत्तला दिलासा दिला होता. IMPPA आदेश याठिकाणी लागू होत नाही कारण संजय त्या संस्थेचा सदस्यच नाही, असे सांगत कोर्टाने नुरानी यांची मागणी फेटाळून लावली होती. संजूबाबाकडून अधिकृत स्टेटमेंटयाप्रकरणी संजूबाबाकडून अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले असून, हे प्रकरण बºयाच कालावधीचे असल्याने त्याविषयीच्या संभाषणात खंड पडल्याचे त्यात म्हटले आहे. यासर्व परिस्थितीबाबत वकिलांचा सल्ला घेतला जाणार आहे. तसेच मी न्यायालयाचा आदर करीत असून, प्रत्येक आदेशाचे पालन करणार असल्याचेही त्यात म्हटले आहे.