कोरोना महामारीच्या काळात फिल्म इंडस्ट्रीसोबतच सर्वसामान्य लोकांनीही आपलं जीवन सुरळीत करण्यावर भर दिलाय. कॅन्सरचं निदान झाल्यावर संजय दत्तसाठी गेले काही दिवस कठिण गेले. सध्या संजय दत्त मुंबईतच ट्रिटमेंट घेत. अशात त्याने 'शमशेरा'चं शूटींग सुरू केल्याचीही चर्चा झाली. त्यामुळे तो नेहमी घरातून बाहेर पडतो आणि फोटोग्राफर्स त्याला कॅमेरात कैद करण्याची संधी सोडत नाहीत. कालही तसंच झालं. पण यावेळी संजय दत्तने फोटोग्राफर्सची मास्कवरून शाळा घेतली.
मंगळवारी संजय दत्त घरातून बाहेर जात होता. तेव्हा फोटोग्राफर्सनी त्याचे फोटो क्लिक करणं सुरू केलं. यादरम्यान पत्नी मान्यताही त्याच्यासोबत होती. आधी संजय दत्तने कॅमेरामनकडे पाहून हात दाखवला. नंतर संजयने त्याच्या मास्कला हात लावत इशारा केला आणि म्हणाला की, 'मास्क लगा ना'.
फोटोग्राफर्स संजय दत्तला लवकर बरा होऊन येण्यासाठी बोलत होते. संजय फोटोग्राफर्सजवळ जाऊन बोलला की, 'मी ठीक आहे. एक मिनिट बंद कर. संजय दत्त त्यांना म्हणाला की, मी ठीक आहे. तसेच फोटोग्राफर्स त्याला म्हणाले की, आमच्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत.
अभिनेता संजय दत्त याला गेल्या महिन्यात लंग कॅन्सर असल्याचं समजलं होतं. त्याने उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा विचारही केला होता. इतकेच नाही तर त्याच्यासाठी व्हिसाही घेतल्याची बातमी होती. पण नंतर त्याने अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतला. सध्या तो मुंबईतच उपचार घेत आहे.
मान्यताने संजय दत्तचा फोटो केला शेअर, सांगितलं - परिवार कसा करतोय अडचणींचा सामना....
कॅन्सरशी झुंज देत असलेला संजय दत्त कामावर परतणार, घेतला हा मोठा निर्णय