बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (sanjay dutt) याने अलिकडेच त्याचा ६३ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याच्या फिल्मी आणि पर्सनल आयुष्याविषयी चर्चा रंगत आहे. संजयचे ज्याप्रमाणे चित्रपट गाजले त्याचप्रमाणे त्याचं वादग्रस्त आयुष्यही चर्चेत राहिलं. १९९३ च्या बॉबस्फोटाचं प्रकरण साऱ्यांनाच ठावूक आहे. यामध्येच एकेकाळी संजयने त्याच्या घरातील स्टाफवरच गोळीबार केला होता. ज्यामुळे घरात काम करणारी एक बाई जखमी झाल्याचं सांगण्यात येतं.
वयाच्या २२ व्या वर्षी रॉकी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या संजयचं आयुष्य चांगलंच वादग्रस्त राहिलं आहे. यात लहानपणापासून बंदूक चालवायची आवड असणाऱ्या संजयने घरातील स्टाफवरच गोळीबार केला होता. संजय दत्तच्या एका फॅमिली फ्रेंडने हा किस्सा सांगितला होता.
लहान असताना संजय दत्तला एक लाइन्सस असलेली बंदूक सापडली. परंतु, ही बंदूक खरी आहे याची जराही कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे त्याने खेळता खेळता या बंदुकीतून गोळी झाडली आणि ती थेट घरकाम करणाऱ्या स्त्रीला लागली. गोळी लागल्यामुळे ही महिला जखमी झाली. ज्यामुळे दत्त फॅमेलीने तात्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं आणि हे प्रकरण तिथेच मिटवलं.
दरम्यान, संजय दत्तचं आयुष्य विविध कारणांमुळे चर्चेत राहिलं आहे. यात ड्रग्सचा ओव्हर डोस झाल्यामुळे संजय तब्बल २ दिवस झोपून होता. यात त्याचं ड्रग्स सेवन करण्याचं प्रमाण इतकं वाढलं होतं की त्याला नशामुक्ती केंद्रातही ठेवण्यात आलं होतं.