Join us

संजय दत्त करू शकतो ह्या गँगस्टरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 06:00 IST

तिग्मांशु धूलियाचा रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट 'साहेब बीवी और गँगस्टर ३'मध्ये संजय दत्त दिसला होता. त्यानंतर आता सूत्रांकडून समजते आहे की संजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

ठळक मुद्देगँगस्टर करीम लालाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

बॉलिवूडमध्ये संजूूबाबा या नावाने ओळखला जाणारा अभिनेता संजय दत्तने आपल्या करियरमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये गँगस्टरची भूमिका केली आहे आणि तो गँगस्टरची भूमिका खूप चांगल्याप्रकारे करतो. नुकताच प्रदर्शित झालेला तिग्मांशु धूलियाचा रोमँटिक क्राईम थ्रिलर चित्रपट 'साहेब बीवी और गँगस्टर ३'मध्ये संजय दत्त दिसला होता. त्यानंतर आता सूत्रांकडून समजते आहे की संजय अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

करीम लाला मुंबईत राहणाऱ्या पठाणांमधील मोठे नाव होते आणि त्याचबरोबर गुन्हेगारी जगतातील गॉडफादर. करीम लाला अफगाणी वंशातील होता. ज्याने शहरातील स्मगलर हाजी मस्तानसोबत हातमिळवणी करून सत्ता काबीज केली होती. मात्र विचित्र बाब ही आहे की चित्रपट निर्माता मिलन लुथरियाने दहा वर्षांपूर्वी करीम लाला, हाजी मस्तान आणि मुंबईत राहणारा साऊथचा बाहुबली वरदराजन मुदलियारवर चित्रपट बनवण्याची योजना केली होती. ज्यात मस्तानच्या भूमिकेसाठी संजय दत्तची निवड करण्यात आली होती.

जर करीम लालावर चित्रपट बनणार असेल तर संजय दत्त त्या सिनेमात पठाण गॉडफादरच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती असेल, असे बोलले जात आहे. अद्याप या चित्रपटाबाबत अधिकृतरित्या काहीही समजू शकलेले नाही. करीम लालाचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे आणि या बायोपिकमध्ये संजय दत्त कोणत्या भूमिकेत दिसेल हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :संजय दत्त