मी कॅन्सरला पराभूत करीन...! संजय दत्तने शेअर केला नवा व्हिडीओ, पाहून व्हाल इमोशनल
By रूपाली मुधोळकर | Published: October 15, 2020 11:25 AM2020-10-15T11:25:33+5:302020-10-15T11:27:12+5:30
संजय दत्त गेल्या काही दिवसांच्या उपचारानंतर काहीसा अशक्त दिसू लागला आहे. पण तो खचलेला नाही...
फुफ्फुसाच्या कॅन्सरशी झुंज देत असलेला अभिनेता संजय दत्त गेल्या काही दिवसांच्या उपचारानंतर काहीसा अशक्त दिसू लागला आहे. पण तो खचलेला नाही. संजयने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यात संजयने कॅन्सरला पराभूत करण्याचे म्हटले आहे. मी त्याला पराभूत करीन. लवकरच कॅन्सर मुक्त होईल, असे संजय या व्हिडीओत म्हणतोय.
हेअर स्टाइलिस्ट अलिम हकीमने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संजय सलूनमध्ये आहे आणि नवी हेअरकट केल्यानंतर व्हिडीओत चाहत्यांशी संवाद साधताना दिसतोय. ‘हाय, मी संजय दत्त. सलूनमध्ये परत आल्यावर छान वाटले. मी केस कापण्यासाठी आलो आहे. पण तुम्ही पाहू शकत असाल तर हे माझ्या आयुष्यातला नवीन डाग आहे. पण मी लवकरच कॅन्सरला हरवेन,’असे संजय व्हिडीओत म्हणतोय.
हेअर स्टाईलिस्ट अलिमबद्दलही तो बोलतोय. ‘अलिम आणि माझी खूप जुनी ओळख आहे. त्याचे वडील माझ्या वडिलांचे केस कापायचे. ‘रॉकी’ या सिनेमासाठी हकीम साहब माझे स्टायलिस्ट होते. आता अलिम माझा स्टायलिस्ट आहे. नवीन हेअरस्टाईल करायची झाल्यास तो मला बोलावतो,’ असे तो म्हणतोय.
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्याचे वृत्त संजूबाबाच्या कुटुंबासोबतच चाहत्यांनाही जोरदार धक्का होता. काही दिवसांपूर्वी संजयला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर आहे. संजूने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती फॅन्सना दिली होती. आजतकच्या रिपोर्टनुसार संजय दत्तला त्याचा मुलांची काळजी सतावते आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीला जेव्हा संजय दत्तचे रिपोर्टसमोर आले तेव्हा त्याला धक्का बसला होता काही दिवसांनी या आजाराला संजयने स्वीकारले आणि त्याच्याशी लढायला तयार झाला.
सिनेमांवर 700 कोटींपेक्षा अधिक पैसा
कॅन्सरचे निदान होण्याआधी संजयने अनेक सिनेमे साईन केले आहेत. यापैकी काही सिनेमांचे शूटींग पूर्ण झाले आहे तर काहींचे बाकी आहे. ‘केजीएफ 2’ या सिनेमात संजय दिसणार आहे. साऊथच्या सुपरडुपर हिट सिनेमाच्या या सीक्वलमध्ये संजय निगेटीव्ह रोलमध्ये आहे. चित्रपटाच्या काही भागांचे शूटींग बाकी असल्याचे कळतेय. ‘तोरबाज’ या सिनेमात अफगाणिस्तानची कथा पाहायला मिळणार आहे. गिरीश मलिक दिग्दर्शित या सिनेमात संजू आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात संजयसोबत नरगिस फाखरी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. पण संजय दत्तची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘शमशेरा’ या यशराज बॅनरच्या सिनेमात संजू रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. हा सिनेमाची घोषणा झालीय. काही भागांचे शूटींग झालेय. पण बरेच शूटींग बाकी आहे.
याशिवाय ‘पृथ्वीराज’ या सिनेमातही संजय प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे बरेच शूटिंग बाकी आहे.
या सर्व सिनेमांवर 700 कोटींपेक्षा अधिक पैसा लागला आहे. संजयच्या आजारापणामुळे यापैकी काही सिनेमे कसे पूर्ण होतील, हे कळायला मार्ग नाही.
दोन किमोथेरेपीनंतर संजय दत्तची झालीय अशी अवस्था, फोटो समोर येताच चाहते पडले चिंतेत
दिवसेंदिवस खालवतेय संजय दत्तची प्रकृती, कॅन्सरवरील उपचारादरम्यानचा नवा फोटो आला समोर