अभिनेता संजय दत्त याला लंग कॅन्सरचं निदान झालं आहे. या आजाराच्या तो चौथ्या स्टेजवर आहे. इतकेच नाही तर लवकरच या आजाराच्या ट्रीटमेंटसाठी तो परदेशात जाणार असल्याची चर्चा आहे. संजय दत्तचे फॅन्स तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करतायेत. हिदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, परदेशात उपचारासाठी जाण्याआधी संजय दत्त आगामी सिनेमा 'सडक 2'चे डबिंग पूर्ण करणार आहे. रिपोर्टनुसार, प्रॉडक्शनच्या टीमच्या माहितीनुसार, ब्रेकवर जाण्याआधी संजय दत्त डबिंगचे काम पूर्ण करणार आहे. त्याचे थोडसे काम बाकी आहे तो ते पूर्ण करुन जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने संजय दत्त हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे त्याचा कोरोना टेस्टही केली गेली. जी निगेटिव्ह आली. त्यानंतर इतर काही टेस्ट केल्यावर निदान झाले की, संजय दत्तला फुप्फुसाचा कॅन्सर आहे. आता उपचारासाठी तो परदेशात जाणार अशी चर्चा आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर संजय दत्तने ट्विट केले होते, 'मित्रांनो, मी वैद्यकीय उपचारांसाठी थोडा ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि माझा मित्र परिवार माझ्यासोबत आहे. माझी काळजी करू नका असं आवाहन मी माझ्या हितचिंतकांना करतो. तुमचं प्रेम आणि तुमच्या शुभेच्छांमुळे मी लवकरच परतेन,'.