Join us

बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत सामील झाला संजय दत्त, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:45 IST

संजय दत्त मध्यप्रदेशात सुरू असलेल्या हिंदू एकता यात्रेत सहभागी झाला.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त कायम चर्चेत असतो. नुकतंच संजय दत्त मध्यप्रदेशात सुरू असलेल्या हिंदू एकता यात्रेत सहभागी झाला. यावेळी तोबागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासोबत पायी चालताना दिसला. ही नऊ दिवसांची 'हिंदू एकता पद यात्रा' असून ती स्वतः धीरेंद्र शास्त्री यांनी काढली आहे. अशा परिस्थितीत संजय दत्तला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. या पदयात्रेत देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक सहभागी होत आहेत.

संजय दत्तने धीरेंद्र शास्त्री यांचं भरभरुन कौतुक केलं. तो म्हणाला,  'मी त्यांना (धीरेंद्र शास्त्री) लहान भाऊ मानतो. गुरुजीही मानतो. ते करत असलेले काम खूप मोठे आहे आणि जर त्यांनी मला सांगितले की संजू बाबा तु माझ्यासोबत ये, तर मी जाईन. गुरुजी मी सदैव तुमच्या सोबत आहे आणि सदैव तुमच्या सोबत असेन". यावेळी सजंय दत्तने हर हर महादेव असा जयघोषही केला. 

याशिवाय संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर वयाच्या ६५ व्या वर्षीही तो विविध सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. संजय दत्त सध्या बॉलिवूड नव्हे तर साऊथ सिनेमांमध्येही सध्या चांगलाच सक्रीय आहे. 'लिओ', 'आयस्मार्ट शंकर' अशा सिनेमांमध्ये संजय दत्त झळकला होता. संजय दत्त आता आगामी 'राजासाब', 'केडी-द डेव्हिल', 'विदामुयर्ची' अशा सिनेमांमध्ये काम करणार आहे. एकूणच सध्या बॉलिवूडपेक्षा साऊथ सिनेमांमध्ये संजूबाबाची चलती आहे. संजय दत्तच्या 'KGF 2' मधील नकारात्मक भूमिकेला खूप पसंती मिळाली होती.  

टॅग्स :संजय दत्तहिंदू