Join us

संजय दत्तच्या बायोपिकनंतर बनणार वेबसीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 4:55 PM

संजूबाबाच्या आयुष्यावर तीन भागांमध्ये वेब सीरिज बनणार आहे.

ठळक मुद्देसंजय दत्तच्या आयुष्यातील न पाहिलेले पैलू वेबसीरिजमध्ये

अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत ‘संजू’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा बायोपिक त्याच्या चाहत्यांना व प्रेक्षकांना खूपच आवडला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटानंतर आता संजूबाबाच्या आयुष्यावर आधारीत वेबसीरिज येणार आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील जे पैलू चित्रपटाच्या माध्यमातून उलगडू शकले नाही, ते सर्व वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

संजू या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चित्रपटात दाखवल्या जाणार असल्याचे प्रेक्षकांना वाटले होते. पण या चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाहीत. संजय दत्तवर वेबसीरिज बनवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय डिजीटल प्लॅटफॉर्मने संजय दत्त प्रोडक्शनशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. त्यांना संजूबाबाच्या आयुष्यावर तीन भागांमध्ये वेब सीरिजची निर्मिती करायची आहे. ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. परंतु, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यात दाखवल्या गेल्या नाहीत. या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर त्या सर्व गोष्टी आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वेब सीरिजमध्ये संजय दत्तची भूमिका साकारणार आहे, हे अद्याप समजलेले नाही.संजय दत्तची प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा त्याची फक्त चांगली बाजू दाखवण्यासाठीच ‘संजू’ची निर्मिती केल्याची टीका अनेक लोकांनी केली होती. समाजात मुन्नाभाई म्हणून वावरत असलेल्या संजय दत्तमधील खलनायक जगासमोर आणण्यासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा पुढे सरसावले असून, ते संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार आहेत. रामगोपाल वर्मांचा हा चित्रपट मुख्यत्वेकरून 1993 चे बॉम्बस्फोट आणि एके 56 रायफल बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला झालेल्या अटकेवर बेतलेला असेल. वेब सीरिजमध्ये काय नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.

टॅग्स :संजय दत्त