अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्याचे वृत्त संजूबाबाच्या कुटुंबासोबतच चाहत्यांनाही जोरदार धक्का होता. काही दिवसांपूर्वी संजयला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्याचा कॅन्सर चौथ्या स्टेजवर आहे. संजूने सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती फॅन्सना दिली होती. आजतकच्या रिपोर्टनुसार संजय दत्तला त्याचा मुलांची काळजी सतावते आहे. रिपोर्टनुसार, सुरुवातीला जेव्हा संजय दत्तचे रिपोर्टसमोर आले तेव्हा त्याला धक्का बसला होता काही दिवसांनी या आजाराला संजयने स्वीकारले आणि त्याच्याशी लढायला तयार झाला. संजयला आता त्याच्या 10 वर्षांच्या जुळ्या मुलांची काळजी सतावतेय. संजय दत्त पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जाणार आहे.
संजय दत्तचा जिगरी यार ‘कमली’ अर्थात परेश गहलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले, ‘खरचं विश्वास बसत नाहीये. काहीच दिवसांपूर्वी आयुष्याचा पुढचा टप्पा कसा घालवणार, यावर आपण दोघे बोललो होतो. आपल्याला हिंडता फिरता आले, आयुष्याचे चढऊतार बघता आले आणि एन्जॉय करण्याची संधी मिळाली म्हणून आपण स्वत:ला नशिबवान म्हटले होते. मी आत्ताही तेच म्हणेल. माझा यावर पूर्ण विश्वास आहे की, आपल्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि आपला पुढचा प्रवासही तितकाच सुंदर आणि आनंददायी असणार आहे. देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे भावा.’