Sanjay Dutt On Injured: 'केडी' चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीन शूट करताना संजय दत्त जखमी झाल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचवेळी, संजय दत्तच्या दुखापतीची बातमी आल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत अभिनेत्याला लवकर बरं वाटवा यासाठी प्रार्थना करतायेत. संजय दत्तने स्वत: आपल्या तब्येची अपडेट दिलीय.
संजय दत्तने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करत या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलंय. संजय दत्तने लिहिले, 'माझ्या दुखापतीच्या बातम्या येत आहेत. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की त्या पूर्णपणे निरर्थक आहेत. देवाच्या कृपेने मी बरा आहे. मी केडी या चित्रपटाचे शूटिंग करतो आहे. सीन्स शूट करताना टीम खूप काळजी घेत आहे. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार."
बंगळुरूमध्ये शूटिंग करतोय संजय दत्त संजय दत्त सध्या बंगळुरूमध्ये KD: The Devilच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेम दिग्दर्शित या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत असून शिल्पा शेट्टी आणि रविचंद्रन यांनीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 1970 च्या दशकात बंगळुरू येथे सेट करण्यात आला आहे आणि वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर संजय दत्त KGF चॅप्टर 1 आणि 2 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटात त्याच्यासोबत रवीना टंडन दिसली होती. 'केडी: द डेव्हिल' या कन्नड चित्रपटात संजय पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय दत्त अखेरचा 'शमशेरा' चित्रपटात रणबीर कपूर आणि वाणी कपूरसोबत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळाला नाही. 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.