बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt) पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) आणि त्यांची जुळी मुलं इकरा-शाहरान नुकतीच मुंबईत दिसली. मान्यताने दोन्ही मुलांसह पापाराझींना पोज दिली. इकरा आणि शाहरान या जुळ्या भावंडांना बघून चाहत्यांना सुनील दत्त आणि पत्नी नर्गिस दत्त यांची आठवण झाली. दोघांचे चेहरे हुबेहुब त्यांच्या आजी आजोबांसारखेच आहेत अशी प्रतिक्रिया चाहते देत आहेत. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
संजय दत्त आणि मान्यता दत्त यांना 21 ऑक्टोबर 2010 साली जुळी मुलं झाली. मुलीचं नाव इकरा आणि मुलाचं नाव शाहरान असं ठेवण्यात आलं. दोघंही सध्या दुबईत शिक्षण घेत आहेत. नुकतंच मान्यता दत्त आपल्या दोन्ही मुलांसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली. तिने पापाराझींना थांबून पोजही दिली. व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या नजरा दोन्ही मुलांवर खिळल्या. कारण त्यांच्यात सुनील दत्त आणि नर्गिस यांचीच झलक दिसली. इकराने यावेळी पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता तर केस मोकळे सोडले होते. तिचे निळ्या डोळ्यात चमक दिसत होती. तर मुलगा शाहरान हा कॅज्युअल लूकमध्ये दिसला. दोन्ही मुलांनी आईसह हसतच कॅमेऱ्यासमोर पोज दिली. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून संजय दत्त कुटुंबासोबत दुबईत वास्तव्यास आहे. तसंच त्याने कायम मुलांना लाईमलाईटपासून दूर ठेवले आहे. मुलांना दुबईतील शाळेत पाठवणं हे कधी प्लॅनमध्ये नव्हतं असंही तो म्हणाला होता. दोन्ही मुलं अभ्यासासोबतच खेळातही माहीर आहेत. इकरा जिम्नॅस्टिक्स करते तर मुलगा शाहरान ज्युनिअर प्रोफेशनल फुटबॉल टीममध्ये आहे.