२०१७ मध्ये संजयने ‘भूमी’ चित्रपटाद्वारे बाूलिवूडमध्ये पुनरागमन केलेल्या संजय दत्तला अद्यापही म्हणावा तसा सूर गवसलेला नाही. ‘भूमी’ या कमबॅक सिनेमाला १० कोटीपर्यंतही मजल मारता आली नाही. यानंतर त्याचा ‘साहब, बीवी और गँगस्टर3’ रिलीज झाला. पण हा चित्रपटही सुपरडुपर ‘फ्लॉप’ झाला. या दोन चित्रपटाच्या अपयशानंतर संजूबाबाची चिंता वाढली नसेल तर नवल. येत्या १७ एप्रिलला संजयचा ‘कलंक’ हा चित्रपट रिलीज होतोय. त्यामुळेच मल्टिस्टारर चित्रपट असूनही संजयला या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. ‘कलंक’पाठोपाठ संजयने आणखी एका नव्या क्षेत्रात नशीब आजमावयचे ठरवले आहे. होय, बॉलिवूडचा हा मुन्नाभाई लवकरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करतोय. अलीकडे खुद्द संजयने याबद्दलचा खुलासा केला.
या चित्रपटाच्या कथेबद्दलही त्याने खुलासा केला. हा चित्रपट माझ्या पूर्वजांवर आधारित असेल. हा एक ऐतिहासिक चित्रपट असेल. यात मी माझे पूर्वज मोहयल यांना पडद्यावर दाखवणार. रिअल लाईफमध्ये ते हुसैनी क्षत्रिय ब्राह्मण होते. पैगंबरच्या नातवाला साथ देत त्यांनी युद्ध लढले होते. यात मी राहिब सीन दत्तची भूमिका साकारेल. जो मोहयल्सचा सर्वेसर्वा होता. लवकरच या चित्रपटाची घोषणा होणार, असेही त्याने सांगितले. संजयच्या या चित्रपटाने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. त्याच्या पूर्वजांची कथा संजयला किती यश मिळवून देते, हे पाहणे निश्चितच इंटरेस्टिंग असणार आहे.