बॉलिवूडमध्ये अनेक कालाकारांची उदाहरण आहेत. जे कलाकार ड्रग्सच्या आहारी गेले होते. या जाळ्यातून निघणेही त्यांना गेले होते कठिण. यात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे बॉलीवुडचा मुन्नाभाई, खलनायक,अभिनेता संजय दत्त. संजूबाबाचा ड्रग्सच्या आहारी गेल्यामुळे कशारितीने संघर्ष करावा लागला आहे. हे जगजाहीर आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' या सिनेमातून त्याचा संघर्ष दाखवण्याचा केलेला प्रयत्न सा-यांनी पाहिला. संजय दत्तच्या खासगी जीवनातील रंजक गोष्टींचा उलगडा सिनेमातून करण्यात आल्या होत्या.
संजय दत्तच्या खासगी जीवनात ३०८ गर्लफ्रेंडपासून ते त्याच्या ड्रग्स सेवन करण्यापर्यंतची आयुष्याविषयी आज सारे जाणून आहेत. संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेला होता हे वास्तव जगजाहीर आहे. मात्र यातूनही तो मरता मरता सावरला , कधी काळी रस्त्यावर भीकही त्याला मागावी लागली होती.मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तने जेलची हवासुद्धा खाल्लीय. कोणत्याही सामान्य कैद्याप्रमाणे त्याने शिक्षा भोगली आहे.आजही संजूबाबाच्या जीवनाचं वास्तव ऐकून भल्या भल्यांची पाया खालची जमीन नाही घसरली तर नवल.
संजय दत्तने ड्रग्सच्या जाळ्यात अडकल्या असतानाच एक किस्साही सांगितला होता. त्याने सांगितले होते की, मी इतका ड्रग्स घ्यायचो कधी कधी असे व्हायचे की मच्छर माझ्या शरीरावर येऊन बसला, मी त्याचे निरिक्षण करायचो. मच्छर चावाल्याचे मला जाणवायचेही पण त्यानंतर तो तिथेच मरून जायचा. मला चावल्यानंतर मच्छर सुद्धा जीवंत नाही राहायचा. ड्रग्सने मला कसे बरबाद केले हे मी लपवून ठेवण्यापेक्षा शेअर करत असतो. जेणे करून जे माझ्याबरोबर घडले, जे मी सोसले ते इतरांबरोबर घडु नये. ड्रग्स ही अशी गोष्ट आहे जी भल्या भल्यांना बरबाद करून सोडते. त्यामुळे जी चुक मी केली ती कोणी करू नये अशी इच्छा असते. आपल्या कुटुंबाशी प्रेम करा, कामावर प्रेम करा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम करा यातून आपल्याला वेगळीच ऊर्जा मिळते. ज्यातून आपल्याला आयुष्याचा खरा आनंद मिळतो.
61 वर्षीय संजय दत्तने फुफ्फुसाचा कॅँसर झाल्यामुळे घेतला कामातून ब्रेक
काही दिवसांपूर्वीच संजय दत्तला कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने 8 ऑगस्टला संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याची कोरोनाची टेस्टसुद्धा करण्यात आली होती. कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून दत्त कुटुंबीयांना दिलासा मिळाला असतानाच 61 वर्षीय संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅँसर झाल्या असल्याचे समोर आले होते.