Join us

'आता जास्त साउथचे सिनेमे करणार', संजय दत्तचं मोठं विधान; बॉलिवूडला दिला हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 10:57 AM

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. 'KGF Chapter 2' मध्ये अधीरा बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील 'थलापती ६७' आणि कन्नडमधील 'केडी द डेविल' मध्ये दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. 'KGF Chapter 2' मध्ये अधीरा बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील 'थलापती ६७' आणि कन्नडमधील 'केडी द डेविल' मध्ये दिसणार आहे. अलीकडेच 'केडी द डेव्हिल' (KD The Devil) या कन्नड चित्रपटाचा हिंदीत टीझर प्रदर्शित झाला, या कार्यक्रमात संजय दत्तने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि दक्षिणेवर वक्तव्य केले. यादरम्यान तो म्हणाला की, आता तो अधिकाधिक साऊथ चित्रपटांमध्ये काम करणार आहे. त्याचबरोबर आजच्या काळात बॉलिवूडने दक्षिणेकडून काय शिकले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

संजय दत्त म्हणाला, 'मी केजीएफमध्ये काम केले आहे आणि आता मी केडी - द डेव्हिलमध्ये दिग्दर्शक प्रेमसोबत काम करत आहे. मला असे वाटते की आता मी आणखी दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणार आहे. यासोबत तो म्हणाला की मी केजीएफ आणि एसएस राजामौलीसोबत काम केले आहे. मी पाहिले की येथे खूप उत्कटतेने, प्रेमाने आणि उर्जेने चित्रपट बनवले जातात, त्यामुळे मला वाटते की बॉलिवूडने हे सर्व विसरू नये. बॉलfवूडने आपली मुळे कधीही विसरता कामा नये, असे संजय दत्तचे मत आहे.

संजय दत्त हा बॉलिवूडचा हिट अभिनेता आहे पण त्याने खलनायक बनूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. संजय दत्त अखेरचा रणबीर कपूरच्या शमशेरामध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. या चित्रपटात वाणी कपूरही होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता पण या चित्रपटातही संजय दत्तचे काम प्रत्येकवेळी आवडले होते.

'केडी - द डेव्हिल' या चित्रपटाविषयी सांगायचे तर, या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा १९७० च्या दशकातील आहे. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :संजय दत्त