(Image Credit : Times Of India)
'विस्फोट' (Visfot), 'काबिल' (Kaabil), 'मुंबई सागा' (Mumbai Saga) सारखे सिनेमे देणारे फिल्ममेकर संजय गुप्ता (Filmmaker Sanjay Gupta) आणखी एक वादग्रस्त सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा एक बायोपिक असेल. जो मुंबईतील सर्वात वादग्रस्त आणि पॉप्युलर बार डान्सर स्वीटी (Bar Dancer Sweety) ची कहाणी दाखवेल. स्वीटी ही तिच बार डान्सर आहे जिने सेक्स चेंज केलं आणि ती पुरूषाची महिला बनली होती.
सिनेमात काय असेल?
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, स्वीटीच्या लाइफवर असलेल्या या सिनेमाचं नाव 'टोपाज'(Topaz) असेल. कारण दक्षिण मुंबईतील टोपाज बारमध्ये एका महिलेच्या वेषातील तिच्या परफॉर्मन्स अनेकांना आकर्षित केलं होतं. १९८० ते १९९० च्या काळातील ही कहाणी असेल. त्यावेळी स्वीटीचं नाव फार फेमस होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत दिग्दर्शक समित कक्कड (Samit Kakkad). त्यांचा 'इंदौरी इश्क' हा सिनेमा MX प्लेअरवर गाजला होता.
संजय गुप्ता टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना म्हणाले की, 'स्वीटीवर सिनेमात बनत आहे हे नक्की आहे. स्वीटीच्या कहाणीने स्वत:ला एका शानदार स्क्रीनप्लेच्या रूपात सादर केलं आहे. मला विश्वास आहे की, हा सिनेमा प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करेल. सध्या सिनेमाचं कास्टिंग आणि इतर कामे सुरू आहेत'.
तेच दिग्दर्शक समित कक्कड म्हणाले की, 'हा माझ्या आणि संजयसाठी एक पॅशन प्रोजेक्ट आहे. मी स्वीटीचा फेम आणि फॅनडमला अनुभवलं आहे. मी अनेक वर्ष हे समजून घेण्यात घालवले आहेत की, डान्सर्ससोबत काय होतं. जेव्हा त्या ऑडियन्सच्या हूटिंगला रिस्पॉन्स देत नाहीत. स्वीटीच्या माध्यमातून मी आपल्या शहरातील बार डान्सर्सना जाणलं आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी आणखी प्रतिक्षा करू शकत नाही'.