Join us

22 वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्याकडे होत्या 'या' खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:29 IST

बिग बींसोबतच त्यांच्या जलसा या बंगल्याचं देखील चाहत्यांना विशेष आकर्षण आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजा बिग बींना कोणत्या ओळखीची गरज नाही. बिग बी कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांना अमिताभ यांच्या आयुष्यात काय सुरू आहे, त्यांना काय आवडतं, हे जाणून घेण्याची इच्छा असते. लक्षवेधी बाब म्हणजे बिग बींसोबतच त्यांच्या जलसा या बंगल्याचं देखील चाहत्यांना विशेष आकर्षण आहे. नुकतंच एका पॉडकॉस्टमध्ये दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी अमिताभ बच्चन आणि जलसा बंगल्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

मुंबईत येणार प्रत्येकजण किमान एकदा तरी हा जलसा बंगला पाहण्यासाठी जातो. आतून तो बंगला आणि अमिताभ यांची खोली पाहण्याचं भाग्य दिग्दर्शक संजय गुप्ता यांना मिळालं होतं.22 वर्षांपुर्वी 'कांटे' चित्रपट कथन करण्यासाठी जेव्हा संजय गुप्ता हे अमिताभ बच्चन यांच्या घरी 'जलसा'मध्ये गेले होते. तेव्हा बंगल्यात काय पाहिले आणि त्या वस्तूंची किंमत काय होती, हे त्यांनी सांगितलं. 

संजय गुप्ता म्हणाले, "बिग बींना अतिशय उच्च तंत्रज्ञानाच्या साउंड सिस्टममध्ये रस आहे. त्यांच्या खोलीतील स्पीकर आणि ग्रामोफोन होते. त्याची किंमत 50 ते 60 लाखांपेक्षा जास्त होती. त्याच्या टेबलावर एक मग होता, त्यात 25-30 मॉन्ट ब्लँक डिझायनर पेन होत्या".

दरम्यान, संजय गुप्ता हेॲक्शन-थ्रिलर चित्रपटांच्या रिमेकसाठी ओळखले जातात, ज्यात आतिश , कांटे, काबिल , शूटआउट ॲट लोखंडवाला , शूटआउट ॲट वडाळा , जज्बा आणि जिंदा आणि मुंबई सागा यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी अनेकदा त्यांच्या चित्रपटांमध्ये संजय दत्त आणि जॉन अब्राहम यांना कास्ट केले आहे.  

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड