Join us

संजय कपूरची लेक शनाया कपूर ‘हिरोईन’ बनण्याआधी करणार हे काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 6:00 AM

बॉलिवूडमध्ये आणखी एका अभिनेत्याच्या लेकीचा डेब्यू झालाय अर्थात असिस्टंट डायरेक्टर म्हणून.  ही कोण, तर अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर.

ठळक मुद्देशनाया ,सुहाना खान आणि अनन्या तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. शनाया सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. 

बॉलिवूडमध्ये आणखी एका अभिनेत्याच्या लेकीचा डेब्यू झालाय अर्थात असिस्टंट डायरेक्टर म्हणून.  ही कोण, तर अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर. होय, करण जोहर शनायाला लॉन्च करणार, अशी खबर होती. अलीकडे शनाया करणच्या आॅफिसबाहेर दिसल्यानंतर शनायाचा डेब्यू पक्का मानला गेला होता.आता या डेब्यूची तयारी सुरु झाली आहे. अर्थात हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून शनायाने डेब्यू केलाय.

होय, शनायाची आई महिम कपूर हिने मुलीचा एक जुना फोटो शेअर करत, ही माहिती दिली. माझी लेक शनाया दोन आठवड्यांसाठी लखनौला रवाना झालीय. तिथे ती असिस्टंट डायरेक्टर  म्हणून काम करेल, असे महिमने सांगितले. शनायाला अभिनेत्री बनायचे आहे. पण त्यापूर्वी अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतील सर्व बारकावे शिकण्याकडे तिचा कल आहे. याचमुळे हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्याचा अनुभव तिला घ्यायचा आहे. अर्थात लखनौमध्ये शनाया कुण्या दिग्दर्शकाला असिस्ट करणार, कुठल्या चित्रपटासाठी असिस्ट करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

   अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण आता शनायाचा प्रवास सुरु झालाय. आता या प्रवासात शनाया किती यश मिळवते ते बघूच.  संजय कपूर आणि महीप या दाम्पत्याला शनाया आणि जहान नावाची दोन मुले आहेत. शनाया ,सुहाना खान आणि अनन्या तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. शनाया सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे. 

टॅग्स :शनाया कपूरसंजय कपूर