Join us

Corona Virus : संजय खान यांच्या लेकीच्या घरी आढळला कोरोना पॉझिटीव्ह, कुटुंबासोबत झाली क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 10:03 IST

एक नवी पॉझिटीव्ह केस

ठळक मुद्देअलीकडे फराह खान अली एका ट्विटमुळे चर्चेत आली होती. 

मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही या व्हायरसच्या संक्रमणाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. बॉलिवूड सिंगर कनिका कपूरनंतर निर्माता करीम मोरानी यांच्या कुटुंबाला कोरोना झाला. यानंतर अभिनेत्री श्रेया सरनचा पती, अभिनेता पूरब कोहलीच्या कुटुंबालाही या व्हायरसने ग्रासले. आता एक नवी पॉझिटीव्ह केस समोर आली आहे. होय, अभिनेता संजय खानची लेक आणि हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खान हिची बहीण फराह खान अली हिच्या एका स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाली आहे.

फराह खान अलीने स्वत: ही माहिती दिली. ‘कोरोना झाल्याची बातमी कोरोना व्हायरसपेक्षाही वेगाने पसरते. माझ्या घरी एका स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित व्यक्तिला क्वारंटाइनमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनीही कोरोना टेस्ट केली आहे. शिवाय आम्ही   सगळे सदस्यही सेल्फ क्वारंटाइन झालो आहोत,’ अशी माहिती तिने ट्विट करून दिली.

फराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. ती पेशाने ज्वेलरी व फॅशन डिझाईनर आहे. अनेकदा ती राजकीय मुद्यांवर आपले मत मांडताना दिसते. हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खान ही फराहची बहीण. अभिनेते फिरोज खान तिचे काका आहेत तर अभिनेता फरदीन खान चुलत भाऊ आहे.

अलीकडे अमित शहांना केले होते लक्ष्य

अलीकडे फराह खान अली एका ट्विटमुळे चर्चेत आली होती. होय, आपल्या ट्विटमध्ये फराहने थेट गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले होते. ‘काय गृहमंत्री अजूनही बेपत्ता आहेत. ते खूप दिवसांपासून कुठल्याही न्यूज चॅनल वा मीडियात दिसले नाहीत. ऐरवी ते आलेत की, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. अमित शहा कुठे आहेत? खरच जाणून घ्यायचेय. कुणाला याबद्दल काही ठाऊक आहे?’ असे अनेक सवाल तिने आपल्या ट्विटमधून केले होते.  मग काय होणार, फराहच्या या ट्विटवर कमेंटचा जणू पूर आला़ होता. तिचे ट्विट प्रचंड व्हायरल झाले होते.

टॅग्स :संजय खानसुजैन खान