Join us  

संजय लीला भन्साळींची भाची आणि अभिनेत्री शर्मीन सहगलने गुपचूप उरकला साखरपुडा, इटलीमध्ये होणार शाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 4:11 PM

शर्मीनने या वर्षाच्या सुरुवातील गुपचूप साखरपुडा उरकून घेतला आहे.

संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे, त्याला कारणही तसेच आहे त्यांची भाची आणि अभिनेत्री शर्मीन सहगल लग्नाची तयारी सध्या सुरु आहे. शर्मीनने या वर्षाच्या सुरुवातील गुपचूप साखरपुडा उरकून घेतला आहे. 2023 च्या अखेरीस ती लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं कळतंय. यासाखरपुड्या बाबतची कोणतीच अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार शर्मीन सेहगलने अहमदाबादमधील एका हिरे व्यापाऱ्याशी साखरपुडा केला आहे. हे एक अरेंज्ड मॅरेज आहे आणि हे कपल 2023 च्या शेवटी इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा प्लान करत आहेत. त्यामुळे घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मात्र शर्मीनचा होणार पती कोण आहे याबाबत काही माहिती मिळालेली नाही. 

शर्मीन सहगल ही संजय लीला भन्साळी यांची बहीण बेला सहगल यांची मोठी मुलगी आहे. शर्मीन सहगलने 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'गंगूबाई काठियावाडी' सारख्या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संजय लीला भन्साळींसोबत काम केले आहे.

 शर्मीन सहगलने 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मलाल या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात जावेद जाफरी यांचा मुलगा मीजान जाफरीही होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय त्याने प्रतीक गांधीसोबत 'अतिथी भूतो भव' या चित्रपटातही काम केले आहे. ती लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख यांसारख्या स्टार्स आहेत. शर्मीन सहगलच्या करिअरसाठी हिरामंडी खूप महत्त्वाची ठरू शकते. शर्मीनची आतापर्यंतची कारकीर्द काही खास राहिली नाही. त्याला फारसे नाव-प्रसिद्धीही मिळालेली नाही. पण मल्टिस्टारर हिरामंडी त्याच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरु शकतो. 

टॅग्स :संजय लीला भन्साळी