बॉलिवूडमध्ये आणखी दोन स्टारकिड्सची एन्ट्री पक्की झालीय. होय, दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी लवकरच दोन स्टारकिड्सला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. भन्साळी ‘मलाल’ नामक चित्रपट प्रोड्यूस करताहेत. या चित्रपटातून भन्साळी आपली भाची शर्मिन सहगल हिचा लॉन्च करत आहेत. याच चित्रपटातून अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.
‘मलाल’ हा चित्रपट दिग्दर्शक मंगेश दिग्दर्शित करणार आहे. मंगेशने याआधी नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘देख सर्कस देख’ दिग्दर्शित केला होता. ताज्या बातमीनुसार, मंगेश या चित्रपटाला ‘भन्साळी ट्रिटमेंट’ देणार आहे. ११ वर्षांनंतर भन्साळी पुन्हा एकदा दोन नव्या चेहऱ्यांना लॉन्च करणार आहे. ११ वर्षांपूर्वी त्यांनी सोनम कपूर आणि रणबीर कपूर यांना ‘सावरियां’मधून लॉन्च केले होते. हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर फ्लॉप ठरला होता. पण यातील सोनम आणि रणबीरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. आता भन्साळी खुद्द आपल्या भाचीला लॉन्च करणार आहेत. शर्मिन ही भन्साळींच्या बहीणीची मुलगी आहे. शर्मिनमधील टॅलेन्ट बघूनचं भन्साळींनी तिला लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ तिच्याचमुळे भन्साळी ‘मलाल’ प्रोड्यूस करत आहेत.शर्मिन सहगल व मिजान जाफरीनंतर संजय लीला भन्साळी पूनम ढिल्लोचा मुलगा अनमोल आणि पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा यांनाही लॉन्च करणार असल्याचे कळतेय.तूर्तास तरी शर्मिन व मिजानच्या लॉन्चिंगची जोरदार तयारी सुरू आहे. आता या चित्रपटाचे भविष्य आपण बघूच. शर्मिन व मिजानचा हा डेब्यू किती यशस्वी होतो, तेही बघू.