Join us

संजय लीला भन्साळींचा Love And War! विकी कौशल, आलिया आणि रणबीर दिसणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 18:10 IST

संजय लीला भन्साळींच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशल, आलिया भट आणि रणबीर कपूर हे त्रिकुट पाहायला मिळणार आहे. 

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या बिग बजेट सिनेमांसाठी ओळखले जातात. 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला', 'देवदास', 'पद्मावत' असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले. आता नुकतीच त्यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. संजय लीला भन्साळींच्या नव्या सिनेमाचं नाव 'लव्ह अँड वॉर' असं असणार आहे. या सिनेमात विकी कौशल, आलिया भट आणि रणबीर कपूर हे त्रिकुट पाहायला मिळणार आहे. 

विकी कौशलने त्याच्या सोशल मीडियावरुन संजय लीला भन्साळींच्या या नव्या सिनेमाबाबत अपडेट दिली आहे. विकीने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. या पोस्टरवर विकी कौशल, रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या सह्यादेखील आहेत. विकीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. या सिनेमातून पहिल्यांदाच रणबीर, आलिया आणि विकी एकत्र दिसणार आहेत. संजय लीला भन्साळींबरोबर विकी कौशलचा हा पहिलाच सिनेमा आहे. 

रणबीर कपूरने संजय लीला भन्साळींच्या सावरिया सिनेमातूनच २००७ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता भन्साळींबरोबर हा त्याचा दुसरा सिनेमा आहे. तर आलियाही गंगूबाई काठियावाडी सिनेमानंतर पुन्हा एकदा भन्साळींबरोबर काम करताना दिसणार आहे. 'लव्ह अँड वॉर' हा भन्साळींचा सिनेमा २०२५ च्या ख्रिसमसला प्रदर्शित केला जाणार आहे. 

टॅग्स :संजय लीला भन्साळीविकी कौशलरणबीर कपूरआलिया भट