Join us

संजय लीला भन्साळींना अंक शास्त्राचा ‘आधार’! ‘पद्मावती’तील I गेला आणि आला अधिकचा A !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 8:39 AM

संजय लीला भन्साळींचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘पद्मावती’ आता ‘पद्मावत’ नावाने ओळखला जाणार आहे. आज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी याबाबतची ...

संजय लीला भन्साळींचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘पद्मावती’ आता ‘पद्मावत’ नावाने ओळखला जाणार आहे. आज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. फेसबुकवर चित्रपटाच्या अधिकृत अकाऊंटचे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले. विशेष म्हणजे, हे नाव बदलताना एक ‘बदल’ अनेकांच्या नजरेत भरला.  होय, ‘पद्मावती’ वरून ‘पद्मावत’ बनलेल्या या चित्रपटाचा अंकशास्त्राशी असलेला संबंध यानिमित्ताने सगळ्यांच्या समोर आला.स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळींसाठी ३, ६ आणि ९ हे लकी नंबर आहेत. आधी भन्साळींच्या या चित्रपटाचे नाव ‘पद्मावती’ होते. म्हणजे, याच्या इंग्रजी अक्षरांची बेरीज ९ येत होती. म्हणजे, हे नाव भन्साळींच्या भाग्यांकाला धरून होते. पुढे वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करण्याचा आदेश दिला आणि इथेच नेमका घोळ झाला. कारण, या नावाच्या इंग्रजी अक्षरांची बेरीज ८ येते. याच नावाने चित्रपट प्रदर्शित झाला तर तो दणकून आपटणार, कदाचित हे भन्साळींना माहित असावे. यातून युक्ती तर काढावीच लागणार ना? भन्साळींनी यावरही ‘मात्रा’ शोधलीच. ती काय तर ‘पद्मावत’च्या नावात अधिकचे ‘ए’ हे इंग्रजी आद्याक्षर जोडले गेले आणि  ‘Padmavat’चे इंग्रजीतील स्पेलिंग Padmaavat असे करण्यात आहे.ASLO READ : ​२५ जानेवारी! अखेर ‘पद्मावत’ची रिलीज डेट ‘लॉक’; बॉक्सआॅफिसवर रंगणार ‘पद्मावत’ विरूद्ध ‘पॅडमॅन’ मुकाबला!अगदी शूटींगच्या पहिल्या दिवसांपासून वादात साडलेला  ‘पद्मावत’ हा चित्रपट अखेर येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार असल्याचे कळतेय. अर्थात अद्यापही निर्मात्यांकडून रिलीजची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.  खरे तर  ‘पद्मावत’आधी १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र सातत्याने चित्रपटाला होणा-या विरोधामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.  करणी सेनेसारख्या राजपूत संघटनांनी हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती.(अद्यापही ही भूमिका बदलेली नाही.) अखेर, हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. सुप्रीम कोर्टाने या वादाचा चेंडू सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात टोलवला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने पाच कट्ससोबत चित्रपटाला हिरवी झेंडी दिली होती. तोडगा काढण्याच्या प्रयत्नात  ‘पद्मावती’चे नाव बदलून ‘पद्मावत’ करण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले होते. एवढेच नाही तर चित्रपटातील  ‘घूमर’ गाण्यात काही बदल करण्याचेही सुचवले होते.