अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) यांनी संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या 'सांवरिया' (Sawariya Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. या चित्रपटाच्या क्लायमॅक्समधील रणबीरचा अभिनय पाहून भन्साळी भावुक झाले होते. खुद्द संजय लीला भन्साळी यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.
हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी यांनी सांवरिया चित्रपटांबद्दल सांगितले. ते सांवरियाच्या क्लायमॅक्स सीनबद्दल बोलले. ज्यामध्ये सेटवर ७ मिनिटे सर्वजण शांत झाले. संजय लीला भन्साळी यांनी मुलाखतीत कलाकारांना त्यांची भूमिका त्यांच्या पद्धतीने साकारण्याचे स्वातंत्र्य देत असल्याचे सांगितले. यादरम्यान, सांवरियाच्या क्लायमॅक्समध्ये त्यांना रणबीर कपूरचे असंख्य क्षण आठवले.
कला शुद्ध असली पाहिजे
भन्साळी म्हणाले की, हे माझ्या आवडत्या भागापैकी एक आहे, ज्यात कलाकार काय काय करू शकतो हे दाखवून दिले. ७ मिनिटे पूर्ण शांतता पसरली होती. त्याने ज्या पद्धतीने अभिनय केला, एका शॉटमध्ये जादू केली. मी फक्त तिथेच बसून रडत होतो आणि त्याच्याकडे बघत मला जाणवले की तो एक अभिनेता आहे. चांगला मुलगा, वाईट मुलगा, चांगला माणूस, वाईट माणूस नाही. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे. कलाकार कधीही चांगला किंवा वाईट नसावा. कला शुद्ध असली पाहिजे. म्हणजे ती शुद्धता प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.
रणबीर कपूर आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. लव्ह अँड वॉर असे या चित्रपटाचे नाव असून यात आलिया भट आणि विकी कौशलही दिसणार आहेत.