Join us

​‘पद्मावती’वरून रान पेटले असतानाच संजय लीला भन्साळी करणार मोठ्ठा धमाका! रिलीज होणार दुसरा ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 6:43 AM

‘पद्मावती’वरून वातावरण तापलेले असतानाच या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कुठला तर ...

‘पद्मावती’वरून वातावरण तापलेले असतानाच या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कुठला तर ‘पद्मावती’च्या ट्रेलर लॉन्चचा. होय, ‘पद्मावती’चा ट्रेलर आधीच रिलीज झालाय, हे आम्हाला ठाऊक आहे. पण आता भन्साळी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करणार आहेत.‘पद्मावती’वरून देशभर रान माजले आहे. देशभर चित्रपटाला विरोध होतो आहे. राजकीय पक्ष, अनेक राजपूत संघटना व राजस्थानातील काही राजघराण्यांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला आहे. काहींनी तर थेट भन्साळींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या चित्रपटात  राणी पद्मावतीची भूमिका साकारणा-या दीपिका पादुकोणलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आले आहे. आता हा चित्रपट कधी रिलीज होईल हे सांगता येणार नाही. पण या सगळ्या वादात भन्साळी मात्र चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करून धमाका करण्याच्या तयारीत आहेत. ‘पद्मावती’च्या विरोधकांना संदेश देणे, हा भन्साळींच्या या निर्णयामागचा उद्देश असल्याचे कळते. दुस-या ट्रेलरमध्ये भन्साळींचा सगळा फोकस दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर यांच्यावर असणार आहे. म्हणजेच भन्साळी या ट्रेलरमध्ये दीपिका व शाहिदचा रोमॅन्टिक अँगल दाखवू इच्छितात. जेणेकरून या चित्रपटात अलाऊद्दीन खिल्जीवर फोकस केलेला नाही, हे लोकांना कळावे. भन्साळींचा उद्देश निश्चितपणे चांगला आहे. पण त्यांचा हा निर्णय किती जणांच्या गळी उतरतो, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.ALSO READ : padmavati controversy : ​माफ करा, पण ‘पद्मावती’चे प्रदर्शन वाटू लागलेयं अशक्य!!भन्साळींना ‘पद्मावती’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत.   पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादात सापडला. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत, सर्वप्रथम राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या सेटवर धिंगाणा घातला. यावेळी भन्साळींना मारहाणही करण्यात आली. यानंतर चित्रपटाचा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला. पण इथेही काही अज्ञातांनी सेटवर आग लावली. आता तर हा चित्रपट रिलीज होऊच देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.ALSO READ : Watch : ​केवळ अप्रतिम! चुकूनही पाहायला विसरू नये, असा ‘पद्मावती’चा शानदार ट्रेलर रिलीज!!