धमक्यांमुळे घाबरले संजय लीला भन्साळी ! ‘पद्मावती’चा काढला इतक्या कोटींचा विमा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 5:39 AM
‘पद्मावती’च्या रिलीजचा जोरदार विरोध सुरु आहे. राजपूत करणी सेनेने या चित्रपटात तथ्यात्मक उणीवा असल्याचा आरोप करत या चित्रपटाला विरोध ...
‘पद्मावती’च्या रिलीजचा जोरदार विरोध सुरु आहे. राजपूत करणी सेनेने या चित्रपटात तथ्यात्मक उणीवा असल्याचा आरोप करत या चित्रपटाला विरोध चालवला आहे. राजपुताना संघ या राजपूत गटाने ‘पद्मावती’च्या मेकर्सला जाहिर धमकी दिली आहे. एवढे कमी की, काय म्हणून गुजरात भाजपा व काँग्रेस या राजकीय पक्षांनीही चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पद्मावती’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी काहीसे भयभीत आहेत. विरोध वाढला तर ‘पद्मावती’ला मोठे नुकसान होऊ शकते. हा संभाव्य धोका लक्षात घेत, ‘पद्मावती’चा विमा काढण्यात आला आहे. होय, एका युनिट मेंबरने दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’चा १६० कोटींचा विमा करण्यात आला आहे.या विमा पॉलिसीनुसार, ‘पद्मावती’च्या रिलीजनंतर तिकिट विक्रीदरम्यान चित्रपटाला विरोध झाल्यास वा तोडफोड झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळेल.जयपूरमध्ये ‘पद्मावती’ला जोरदार विरोध होत आहे. ‘पद्मावती’तील वितरकांना वारंवार धमक्या मिळत आहेत. त्यामुळे ‘पद्मावती’ला जयपूरमध्ये अद्याप वितरक मिळू शकलेला नाही. भाजपा नेत्या उमा भारती, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला आणि करणी सेनेने ‘पद्मावती’ला विरोध केला आहे. करणी सेनेचे संरक्षक लोकेंद्र सिंह यांनी ‘पद्मावती’त दीपिका पादुकोणवर चित्रीत गाण्यालाही विरोध दर्शवला आहे. ‘पद्मावती’च्या रूपातील दीपिकाला नाच-गाणे करताना दाखवणे संतापजनक असल्याचे, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही ‘पद्मावती’च्या वादात उडी घेतली आहे. त्यांनी टिष्ट्वटरवर एक खुले पत्र लिहिले आहे. यात त्यांनी अलाऊद्दीन खिल्जी एक व्यभिचारी हल्लेखोर होता. त्याची राणी पद्मावतीवर वाईट नजर होती, असे म्हटले आहे. एकीकडे ‘पद्मावती’ला असा विरोध सुरु असताना निवडणूक आयोगाकडून मात्र ‘पद्मावती’च्या मेकर्सला काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. गुजरातेतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘पद्मावती’ची रिलीज डेट लांबणीवर टाकावी किंवा या चित्रपटावर बंदी लादावी, ही गुजरात भाजपाची मागणी निवडणूक आयोगाने धुडकावून लावली आहे. निवडणूक आयोगाने ‘पद्मावती’वर बंदी लादण्यास किंवा त्याची रिलीज डेट पुढे ढकण्यास नकार दिला आहे.ALSO READ: भाजपाची ‘पद्मावती’वर बंदीची मागणी; जाणून घ्या काय आहे कारण!