Join us

या महिलेमुळे वाढला संजय-सलमानमध्ये दुरावा??

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2016 12:08 PM

संजय दत्त आणि सलमान खान यांची मैत्री आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आधी या दोघांच्या मैत्रीचे दाखले देतांना लोक थकत ...

संजय दत्त आणि सलमान खान यांची मैत्री आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. आधी या दोघांच्या मैत्रीचे दाखले देतांना लोक थकत नसत. आता मात्र संजयपासून सलमान दूर पळताना दिसतोयं. संजयच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरला घेतल्याने सलमान ‘खफा’ आहे, असेही बोलले जातेयं.(आता कॅटरिना कैफमुळे रणबीरशी सलमानचे जराही पटत नाही, हे जगजाहिर आहे.) पण असे नाहीयं. संजय-सलमानमध्ये नेमके कशाने बिनसले, याचे खरे कारण एक महिला असल्याचा दावा एका वेबपोर्टलने केला आहे. संजय व सलमानमध्ये रणबीरमुळे नाही तर रेशमा शेट्टी नामक महिलेमुळे बिनसले, असा दावा या वेबपोर्टलने केला आहे.ही रेशमा सलमानची मॅनेजर आहे. रिपार्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, संजय डिसेंबर २०१४ मध्ये पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता, तेव्हा सलमानने त्याला रेशमाला नोकरीवर ठेवण्याचा सल्ला दिला होता. संजयला आपली प्रतीमा सुधारण्यासाठी रेशमाची मदत होईल, असे सलमानने मत होते. साहजिक सलमानचा सल्ला मानून संजयने रेशमाला नोकरीवर ठेवले. मात्र अनेक महिन्यानंतरही संजयला एकही प्रोजेक्ट मिळाला नाही. याचे कारण म्हणजे रेशमाने संजयची प्राईज अव्वाच्या सव्वा वाढवून टाकली होती. यामुळे कुठलाही निर्माता संजयला घेण्याचा विचारही करू शकत नव्हता. हे कळल्यानंतर संजयचा संताप संयुक्तिक होता. संजय जाम चिडला आणि त्याने रेशमाची हकालपट्टी केली. सूत्रांच्या मते, ही गोष्ट सलमानच्या चांगलीच जिव्हारी लागली. संजयने रेशमाचा अनादर केला, असे सलमानला वाटते आहे. अर्थात संजयने आपली बाजू मांडली पण सलमान नेहमीप्रमाणे काहीही ऐकण्याच्या मूडमध्ये नाही.याचा परिणाम तुमच्या समोर आहे.