Join us

‘त्या’ प्रश्नाने सोडला नाही राजकुमार हिराणींचा पिच्छा! अखेर दिले उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 10:55 AM

‘संजू’ हा संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होता का? जनमानसतातील त्याची प्रतीमा उंचावण्यासाठी हा चित्रपट काढला गेला का? असे हिराणींना यावेळी विचारण्यात आले.

संजय दत्तचा बायोपिक ‘संजू’ने बक्कळ कमाई केली. आता तर हा सिनेमा चित्रपटगृहातूनही उतरला आहे. पण तरिही या चित्रपटाबद्दलचा एक प्रश्न कायम विचारला जातोय. होय, शेवटी राजकुमार हिराणींनी हा चित्रपट का बनवला? हाच तो प्रश्न. अखेर राजकुमार हिराणींनाही या प्रश्नाचे उत्तर देणे भाग पडले. इंटनॅशनल फिल्म फेस्टिवल आॅफ मेलबर्नमध्ये ‘संजू’ दाखवण्यात आला. यादरम्यान आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार हिराणींनी या प्रश्नचे उत्तर दिले. 

 ‘संजू’ हा संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न होता का? जनमानसतातील त्याची प्रतीमा उंचावण्यासाठी हा चित्रपट काढला गेला का? असे हिराणींना यावेळी विचारण्यात आले. यावेळी त्यांनी ‘संजू’वरचे सगळे आरोप खोडून काढलेत. तुम्ही ‘संजू’पाहिला असेल तर संजयने काय गुन्हा केला ते सांगा, असा प्रतिप्रश्न त्यांनी  केला. हो, त्याच्याकडे शस्त्र सापडली. आम्ही ते चित्रपटात दाखवले. त्याने यासाठी पाच वर्षांची शिक्षा भोगली, तेही चित्रपटात आम्ही दाखवले. जो गुन्हा होता, आम्ही तो पूर्णपणे दाखवला. संजयच्या ३०८ गर्लफ्रेन्ड होत्या. त्याला ड्रग्जचे व्यसन होते. त्याने आपल्या मित्राच्याच प्रेयसीशी शय्यासोबत केली. यात काय व्हॉईवॉशिंग आहे. त्याची इमेजचं बनवायची असती तर आम्ही या सगळ्या गोष्टी दाखवल्या नसत्या, असे हिराणी म्हणाले.

‘संजू’ हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्त दोषी ठरला होता. पण या भूतकाळावर पडदा टाकून फक्त त्याच्या मेकओव्हरची गोष्ट सिनेमात दाखवण्यात आलीय, असा जाहीर ठपकाही ठेवला गेला आहे. 

 

टॅग्स :राजकुमार हिरानी