Join us

संजूबाबाच्या बायोपिकने वाढवली मान्यता दत्तची चिंता? रणबीर कपूरचा वाढला वैताग?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 5:55 AM

संजय दत्तची बेटरहाफ मान्यता दत्त सध्या चिंतीत आहे. कशामुळे तर संजय दत्तच्या येऊ घातलेल्या बायोपिकमुळे. एकीकडे प्रेक्षक हे बायोपिक ...

संजय दत्तची बेटरहाफ मान्यता दत्त सध्या चिंतीत आहे. कशामुळे तर संजय दत्तच्या येऊ घातलेल्या बायोपिकमुळे. एकीकडे प्रेक्षक हे बायोपिक पाहण्यासाठी उत्सूक असताना मान्यताची मात्र या बायोपिकमुळे झोप उडाली आहे. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, या बायोपिकमुळे मान्यता कमालीची अस्वस्थ आहे.संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेल्या या आगामी चित्रपटात मान्यताची भूमिका अभिनेत्री दीया मिर्झा साकारताना दिसणार आहे. आपले पात्र दीया पडद्यावर कशी मांडते? मान्यताच्या व्यक्तिरेखेच्या वाट्याला चित्रपटात किती वेळ आला आहे? असे सगळे प्रश्न मान्यताला पडले आहेत. आपल्या बद्दल संजयच्या बायोपिकमध्ये काय दाखवले जाईल, संजयची तिसरी पत्नी म्हणून आपल्याला जगापुढे कसे आणले जाईल, याबद्दल म्हणे मान्यता साशंक आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली ही अस्वस्थता दूर करण्यासाठी अखेर मान्यताने म्हणे रणबीर कपूर व चित्रपटातील अन्य काही जणांना  फोन करणे सुरु केले आहे. सतत चित्रपटाशी संबंधित व्यक्तिंना फोन करून आपल्या भूमिकेविषयी बारीकसारिक तपशील घेण्याचे प्रयत्न मान्यताने आरंभले आहेत. आता या वारंवार केलेल्या कॉल्समुळे मान्यताच्या मनातील साशंकता किती दूर झाली हे कळायला मार्ग नाही. पण एक नक्की यामुळे रणबीर व अशाच अनेकांना वैताग मात्र नक्की वाढला असावा.या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे. संजयचे वडील सुनील दत्त यांच्या भूमिकेत परेश रावल तर आई नर्गिस यांच्या भूमिकेत अभिनेत्री मनीषा कोईराला दिसणार आहे. याशिवाय सोनम कपूर, अनुष्का शर्मा यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.ALSO READ : ​काय?? पत्नी मान्यता दत्तचे बिकनी फोटो पाहून भडकला संजय दत्त!!मान्यता ही संजयची तिसरी पत्नी आहे. २००६ मध्ये तिची व संजयची भेट झाली होती. यानंतर २००८ मध्ये ५२ व्या वर्षी संजयने मान्यताशी तिसरा विवाह केला. दोघांनाही दोन मुले आहेत. संजय दत्तचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले राहिले आहे. आपल्या लग्नापासून तर तुरुंगात शिक्षा भोगण्यापर्यंत असे अनेक बरेवाईट प्रसंग त्याने पाहिले. पण आताश: संजयच्या आयुष्यात मान्यताचे अनन्यसाधारण स्थान आहे. संजयच्या वाईट काळात मान्यता त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आजही ती संजयच्या मागे तशीच खंबीरपणे उभी आहे.