प्रतीक बब्बर गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत लवकरच करणार साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 5:49 AM
अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत एन्गेज्ड ...
अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर लवकरच गर्लफ्रेन्ड सान्या सागरसोबत एन्गेज्ड होणार असल्याची खबर आहे. होय, येत्या २२ जानेवारीला प्रतीक व सान्याची एन्गेजमेंट होणार आहे.गेल्या आठ वर्षांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना ओळखतात. पण गत वर्षभरापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक व सान्याचा साखरपुडा लखनौत होणार आहे. कारण सान्या ही मूळची लखनौची आहे. कुटुंबातील सदस्य आणि अतिजवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा साखरपुडा होईल. सान्या ही पेशाने रायटर, डायरेक्टर व एडिटर आहे. एका राजकीय नेत्याची मुलगी असलेली सान्या सहा महिन्यांपूर्वी लंडनहून पोस्ट गॅज्युएशन करून परतली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सान्या व प्रतीक एकमेकांना डेट करत आहेत.प्रतीकने २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ‘धोबी घाट’,‘दम मारो दम’, ‘एक दिवाना था’ या चित्रपटांत प्रतीक दिसला. पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही. ALSO READ : स्मिता पाटील-राज बब्बरचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या व्यसनाविषयी केला खळबळजनक खुलासा!आॅगस्ट २०१७मध्ये प्रतीकने त्याच्या व्यसनाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. मी ड्रग्जच्या अधीन गेलो होतो, असे त्याने सांगितले होते. मी माझ्या आयुष्यात बरीच उलथापालथ झालेली बघितली. फर्स्ट इयरला असताना मित्रांनी माझी ड्रग्जशी ओळख करून दिली आणि मी या गर्तेत सापडलो. अपयश आणि अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेकअपमुळे मी हतबल झालो होतो. यातूनच मी ड्रग्जच्या आहारी गेलो. पण आता मी यातून पूर्णपणे बाहेर आलोय. आता माझा सर्व फोकस माझ्या कामावर असणार आहे, असे प्रतीकने सांगितले होते.सध्या प्रतीक ‘बागी2’मध्ये बिझी आहे. या चित्रपटात तो टायगर श्रॉफसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.