घाबरलीयं सोनम कपूर; श्वास घ्यायला होतोयं त्रास! जाणून घ्या काय आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 9:52 AM
अभिनेत्री सोनम कपूर सध्या मुंबईत आहे आणि मुंबईत सोनमचा श्वास कोंडू लागला आहे. होय, स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत सोनम ...
अभिनेत्री सोनम कपूर सध्या मुंबईत आहे आणि मुंबईत सोनमचा श्वास कोंडू लागला आहे. होय, स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत सोनम कपूरला श्वास घ्यायला त्रास होतो आहे. आता इतक्या दिवस सोनमला असा कुठलाही त्रास झाला नाही, मग अचानक हा त्रास कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा प्रश्न साहजिकही आहे. कारण सोनमबद्दल आपण कधीच अशी गोष्ट ऐकली नाही. पण आता खुद्द सोनमचं याबद्दल बोलली आहे. होय, सोनमचे ट्वीट वाचल्यास तुम्हालाही काय ते कळेल. ‘मला आयुष्यात कधीही श्वास घ्यायला त्रास झाला नाही. पण काही दिवसांपासून मला श्वास घेताना त्रास होतोय. मला ब्रोंकायटिस झालाय. हे प्रचंड घाबरवणारे आहे,’ असे ट्वीट सोनमने केले आहे. मुंबईत हवेतील प्रदूषणाचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढले आहे. त्याचाच हा परिणाम आहे. विशेष म्हणजे, सोनम कपूरने अभिनेत्री रिचा चड्ढा हिची पोस्ट रिट्वीट केली आहे. यात रिचाने सुद्धा तिला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे म्हटले आहे. ‘माझ्याशिवाय अन्य कुणाला मुंबईभर पसरलेली धूळीची चादर दिसतेय का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घ्यायला अडचण येतेय. जणू मी पावडर खातेय, असे वाटतेय,’असे रिचाने लिहिले आहे. एकंदर काय तर सोनम आणि रिचा दोघींनीही मुंबईतील वाढत्या हवेच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. सोनमला तर या प्रदूषणाने ब्रोकायटिसारखा आजारही दिला आहे. तूर्तास तरी मुंबईतील प्रदूषण रोखणे आपल्या हातात नाही. केवळ सोनम व रिचाच्या सुदृढ आरोग्यासाठी कामना करणे, एवढेच आपल्या हाती आहे.ALSO READ: -अन् सोनम कपूरचे पित्त खवळले! मीडियाला लिहिले ओपन लेटर!!सध्या सोनम कपूर ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. ‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे.