सेंसार बोर्डाला वैतागून प्रकाश झा करणार चक्क धार्मिक चित्रपटाची निर्मिती!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 2:02 PM
जगभरात अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारांची लयलूट करणाºया दिग्दर्शक प्रकाश झा निर्मित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला अद्यापपर्यंत सेंसार ...
जगभरात अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारांची लयलूट करणाºया दिग्दर्शक प्रकाश झा निर्मित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला अद्यापपर्यंत सेंसार बोर्डाने सर्टिफिकेट दिले नसल्याने आता प्रकाश झा यांनी चक्क धार्मिक चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. होय, हे खरं आहे. आपल्या चित्रपटातून अनेक गंभीर विषयांवर प्रकाशझोत टाकणारे झा दिल्लीतील एका सार्वजनिक कार्यक्रमास सहभागी झाले असता, त्यांनी याबाबतची घोषणा केली. ते म्हणाले की, आता मी ‘सत्संग’ या चित्रपटाची निर्मिती करणार असून, या चित्रपट पूर्णत: धार्मिकतेशी संबंधित असेल. दिल्ली आयोजित केलेल्या एका समारंभात सहभागी झालेल्या प्रकाश झा यांनी एका न्यूज एजन्सीबरोबर याविषयी चर्चा केली. जेव्हा झा यांना त्यांच्या पुढील चित्रपटाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी म्हटले की, माझा पुढचा चित्रपट हा ‘सत्संग’ असेल जो पूर्णत: धार्मिकतेशी निगडीत असेल. जेव्हा या चित्रपटाबाबत त्यांना अधिक विस्ताराने विचारण्यात आले तेव्हा त्यांनी यावर अधिक माहिती देणे टाळले. प्रकाश झा अजूनही त्यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला सेंसार बोर्डाचे प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांच्या मते, सेंसार बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळविले असतानाही सेंसार बोर्डाची भूमिका संदिग्ध आहे. मात्र अशातही झा त्यांच्या निर्णयावर अडीग असून, सेंसार बोर्डाच्या प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे. दरम्यान, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट मियामी, एम्सटरडम, पॅरिस आणि लंडन येथील फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला आहे. सेंसार बोर्डाने २३ फेब्रुवारी रोजी या चित्रपटाबाबत खुलासा करताना म्हटले होते की, हा चित्रपट महिला केंद्रित आहे. त्यामुळे यास प्रमाणपत्र देणे योग्य ठरणार नाही. सेंसारच्या या निर्णयानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती.