‘दंगल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात आमिर खानच्या लहान मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या जाम बिझी आहे. होय, सान्याला एका पाठोपाठ एक अशा चित्रपटाच्या आॅफर्स मिळत आहेत. ‘सीक्रेट सुपरस्टार’ या आमिरच्याच चित्रपटाची कोरिओग्राफी केल्यानंतर सान्याने ‘फोटोग्राफर’ आणि ‘मनमर्जिया’ हे दोन चित्रपट साईन केलेत.लवकरच सान्या विशाल भारद्वाज यांच्या ‘पटाखा’मध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर हिट झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करताहेत. ‘पटाखा’नंतर सान्या आयुष्यमान खुराणासोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘बधाई हो’. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. ‘बधाई हो’नंतर आणखी एक मोठा चित्रपट सान्याच्या झोळीत पडला आहे. हा चित्रपट डान्सवर आधारित असल्याचे कळते. कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस सान्याला घेऊन एक डान्सिंग सिनेमा घेऊन येतोय. बॉस्कोने सीजरसोबत मिळून आत्तापर्यंत बॉलिवूडची सुमारे २०० गाणी कोरिओग्राफ केली आहेत. आता तो दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवतोय. तूर्तास बॉस्कोच्या या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. पण पुढील वर्षाच्या सुरूवातीला याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. सान्याने आत्तापासूनचं या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. सध्या नव-नव्या डान्सिंग स्टेप ती शिकते आहे.
'पटाखा' या सिनेमात सान्या मल्होत्रासोबतच राधिका मदान , सुनील ग्रोव्हर आणि विजय राज यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘बधाई हो’ हा एक फॅमिली ड्रामा आहे. या कुटुंबाला अचानक एक बातमी मिळते आणि या बातमीने अख्खे कुटुंब तणावात येतात. सगळे जण आपआपल्यापरिने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागतात,अशी या चित्रपटाची कथा आहे. अमित शर्मा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे.