Join us

'घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का?' लोकप्रिय अभिनेत्री सान्या मल्होत्राचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 9:27 AM

घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का? असा प्रश्न अभिनेत्री सान्या मल्होत्राने उपस्थित केला.

'दंगल' चित्रपटातील बबिता कुमारी, 'पगलेट'मधील संध्या किंवा 'मिसेस' चित्रपटातील रिचा असो अभिनेत्री सान्या मल्होत्राने नेहमीच पडद्यावर सशक्त स्त्रीच्या भुमिका साकारल्या आहेत.  न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सान्याने 'मिसेस' सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे. यातच अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिनं पुरुषांनी घरकामात मदत करायला हवी, असं म्हटलं. घरातील काम ही फक्त महिलांची जबाबदारी का? असा प्रश्न तिनं उपस्थित केला आणि पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला आहे. 

गृहिणी घरात राबतात, कामं करतात. मात्र, त्या कष्टाची दखल घेतली जात नाही. घरातील कामे महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त तास काम करतात. तरीही त्यांच्या कामाला सन्मान मिळत नाही.  जगातल्या अनेक महिला याच प्रश्नाशी लढताहेत. 'नवभारत टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सान्या मल्होत्राने याच गोष्टींवर बोट ठेवलं. सान्या मल्होत्रा ​​हिने  एका सामान्य गृहिणीच्या जीवनावर भाष्य केलं.  ' घर काम हे अत्यंत कठीम काम आहे. महिलांकडून घरातील कामे करणे अपेक्षित केलं जातं, असं ती म्हणाली. 

घरातील कामे ही महिलांनीच केली पाहिजेत, हे आपल्यात रुजवलं गेल्याचं तिनं म्हटलं. जेव्हा एखाद्या वैयक्तीला स्वयंपाक येत नसेल. तर ती व्यक्ती किती दिवस बाहेरुन जेवण मागवू शकते. स्वयंपाक करणे, घरातील कामे करणे, ही जीवन कौशल्ये आहेत. ही कामं प्रत्येकाला यायला हवीत, असं तिनं म्हटलं.   एक अभिनेत्री म्हणून कोणत्या प्रकारचे चित्रपट करत आहे,  कोणत्या प्रकारची व्यक्तिरेखा साकारत आहेत, हे समजण्याची माझी जबाबदारी आहे. अशा चित्रपटांचा एक भाग बनण्याचा प्रयत्न करते, जे पाहून लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या विचारसरणीत काही बदल होईल, असं तिनं सांगितलं. 

याच मुलाखतीमध्ये सान्याला 'मिसेज' हा लोकप्रिय मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन'चा रिमेक आहे, जो एका सामान्य गृहिणीची नीरस दिनचर्या प्रभावीपणे दाखवतो. हा सिनेमा करताना तुझ्यावर काय परिणाम झाला? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'अशा स्त्रियांबद्दल माझ्या मनात सहानुभूतीची भावना होती. आपल्या आजूबाजूला अशा स्त्रिया पाहतो, ज्या दिवसभर घरातील कामात धडपडत असतात. पण त्यांचं कौतुक केलं जातं नाही. हा इतका थँकलेस जॉब आहे की ही भूमिका साकारताना काही काळानंतर मला गुदमरल्यासारखं वाटायचंय. पण मी साकारलेल्या प्रत्येक पात्रातून मला काहीतरी शिकायला मिळालं. महिलांपेक्षा कोणीही बलवान नाही.  गृहिणीचे काम हे सर्वात कठीण काम आहे आणि केवळ बलवान वैयक्तीच ते कठीण काम करू शकतात'. 

टॅग्स :सान्या मल्होत्रासेलिब्रिटीबॉलिवूड