Join us

सपना चौधरीच्या मृत्यूची अफवा; नावात घोळ झाला अन् खोटी पोस्ट व्हायरल झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 10:16 AM

Fact Check : वाचा, व्हायरल पोस्ट मागचं सत्य

ठळक मुद्दे सपनाने खूप लहान वयात स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय.

आपल्या धमाकेदार डान्सनी सगळ्यांना वेड लावणारी ‘बिग बॉस 11’ फेम हरियाणाची सुप्रसिद्ध डान्सर व अभिनेत्री सपना चौधरी ( Sapna Choudhary) हिच्या मृत्यूची बातमी पसरली आणि सर्वांनाच धक्का बसला. सपनाचा अपघातात मृत्यू झाला, अशी एक पोस्ट व्हायरल झाली आणि  चाहते सपनाचा फोटो शेअर करत तिला श्रद्धांजली देऊ लागलेत. अर्थात काहीच वेळात सपनाच्या मृत्यूची  व्हायरल पोस्ट खोटी असल्याचे सिद्ध झाले. सपनाला काहीही झाले नसून ती अगदी ठणठणीत आहे.सिरसाजवळ झालेल्या एका अपघातात सपना चौधरीचा मृत्यू झाल्याचा दावा या व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला होता. आता या पोस्टमागचे सत्य उघड झाले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सपनाचा नाही तर प्रीती नावाच्या डान्सरचा अपघातात मृत्यू झाला. लोक तिला ज्युनिअर सपना चौधरी नावानेही ओळखतात. 29 ऑगस्टला हरियाणाच्या सिरसाजवळ एक अपघात झाला. यात चार लोक जखमी झाले होते तर एका 30 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हरियाणाच्या एका स्थानिक वाहिनीने सपना चौधरीच्या मृत्यूची खोटी बातमी दाखवली. यानंतर थोड्याच वेळात सोशल मीडियावरही सपना चौधरीच्या मृत्यूची अफवा पसरली.

सपनाने खूप लहान वयात स्टेजला आपलेसे केले. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती डान्स व गाण्यांचे परफॉर्मन्स करतेय. मुळची रोहतक येथे राहणारी सपना यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहे. तिने गायलेले ‘है सॉलिड बॉडी’ हे गाणे तुफान गाजले होते. सपना १२ वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले.

घरची परिस्थिती बेताची असल्याने एवढ्या लहान वयात तिला घरची जबाबदारी उचलावी लागली. त्यामुळेच ती गायन आणि नृत्याकडे वळली. या तिच्या डान्समुळे सपनाने तिच्या घरातल्यांना सगळ्या सुखसोयी दिल्या. तिच्या बहिणीचे लग्न करून दिले. आज तर तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करतात. अनेक वेळा तर तिच्या कार्यक्रमाला लोकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागतो. कोणताही स्टेज शो म्हटला की, एक संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. पण सपनाच्या कार्यक्रमात ती एकटीच अनेक तास लोकांचे मनोरंजन करते 

टॅग्स :सपना चौधरी