Join us

कबीर खानच्या '८३'मध्ये साकीब सलीम साकारतोय या क्रिकेटरची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 4:55 PM

कबीर खान '८३' सिनेमा पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. साकिब सलीम मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्देसाकिबला सिल्वर स्क्रिन खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील '८३' हा  सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे

कबीर खान '८३' सिनेमा पहिल्या दिवसांपासून चर्चेत आहे. साकिब सलीम मोहिंदर अमरनाथ यांची भूमिका साकारणार आहे. साकिब सलीम दिल्लीतील राज्यस्तरीय क्रिकेट टीमचा भाग होता. त्यामुळे आता साकिबला सिल्वर स्क्रिन खेळताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील.

या सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर साहिल खट्टर  माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सिनेमाच्या शूटिंग आधी कलाकारांसाठी मोहालीमध्ये एक बूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये होणारे हे बूट कॅम्प जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात कपिल देव, यशपाल शर्मा, मदन लाल आणि अन्य क्रिकेटर सहभागी होणार आहेत. या कॅम्पमध्ये क्रिकेटर्स सिनेमातील कलाकारांना क्रिकेट शिकवणार आहे.    

 '८३' हा  सिनेमा १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे.  रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' सिनेमामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

टॅग्स :८३ सिनेमासाकिब सलीमरणवीर सिंग