सारा अली खान आणि कार्तिक आर्यन लवकरच इम्तियाज अलीचा आगामी सिनेमा 'लव आजकल 2'मध्ये एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमाचं दिल्लीमध्ये सुरु असलेले शूटिंग नुकतेच संपले आहे. या सिनेमाच्या सेटवरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून सारा अन कार्तिक कायम चर्चेत आहेत. चाहत्यांनी तर सारा आणि कार्तिकच्या जोडीचे ‘सार्तिक’ असे नामकरणही करून टाकले आहे. सारा व कार्तिकचा हा चित्रपट ‘लव आज कल’चा सीक्वल असल्याचे म्हटले जातेय. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. २००९ मध्ये आलेला सैफ अली खान व दीपिका पादुकोणचा ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता. सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुड्डासुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.