Join us

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केदारनाथ चित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2017 9:06 AM

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या आगामी चित्रपट केदारनाथचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. गेल्या अनेक ...

सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्या आगामी चित्रपट केदारनाथचे पहिले पोस्टर लाँच करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत आहे. कारण या चित्रपटातून सैफ अली खान आणि त्याची पूर्व पत्नी अमृता सिंग यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. त्यामुळे या चित्रपटाला घेऊन उत्सुकता सगळ्यांच लागली आहे. आजपासून या चित्रपटाचे शूटिंगदेखील सुरू करण्यात आली आहे. सकाळी पाच वजल्यापासून चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर केदरानाथचे देऊळ, भगवान शंकरांची प्रतीमा आणि हिमालयातील बर्फचे डोंगर दाखवण्यात आले आहेत. पोस्टर बघता चित्रपटाची कथा  2013मध्ये आलेल्या महाप्रलयावर आधारित असावी असा अंदाज लावण्यात येतो आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार चित्रपट सारा एक श्रीमंत घरातील मुलगी दाखवण्यात येणार आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिट्टूच्या भूमिकेत दिसणार आहे. टूरिस्ट गाईडला हिंदीत पिट्टू म्हटले जाते. हा पिट्टू आजारी आणि कमजोर लोकांना आपल्या पाठीवर टाकून त्यांना बर्फाचे डोंगर चढवून नेतो. हा पिट्टू श्रीमंत घरातल्या मुलीच्या प्रेमात पडतो. पिट्टूची भूमिके साकारण्यासाठी सुशांत सिंग राजपूत गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतो आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूरने केदारनाथचे पोस्टर शेअर केले आहे. अभिषेक कपूर जवळपास एक वर्ष चित्रपटाच्या कथेवर काम करत होता.   ALSO READ : View Pics : सारा अली खान अन् सुशांत सिंग राजपूत निघाले ‘केदारनाथ’च्या शूटिंगला!सुशांत सिंग नुकताच नासाला जाऊन चंदा मामा दूर के साठी ट्रेनिंग घेऊन आला आहे. तो या चित्रपटात अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. सुशांत सिंगसह यात आर. माधवनची ही महत्त्वाची भूमिका आहे. नासाला जाऊन ट्रेनिंग घेणार सुशांत हा पहिला अभिनेता ठरला आहे.