सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला दोन महिने उलटून गेले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्ये मागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, आता सुशांतचा मित्र सॅम्युएल होकीपने एक खुलासा केला आहे. त्याने सोशल मीडियावर सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत रिलेशनशीपमध्ये होते, असा दावा केला आहे.सॅम्युएल होकीपने इन्स्टाग्रामवर लिहिले की, 'केदारनाथच्या प्रमोशन दरम्यान सुशांत आणि सारा प्रेमात पडल्याचे मला आठवते. त्या दोघांना वेगळे करणे कठीण होते. दोघांचे नाते अगदी नितळ आणि निरागस होते. सुशांत आणि सारा यांना एकमेकांबद्दल खूप आदर होता जो आजकाल नात्यात क्वचितच दिसतो.
सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपूत होते रिलेशनशीपमध्ये, पण बॉलिवूड माफियाच्या दबावामुळे केला ब्रेकअप?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:53 AM