सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. या पहिल्या-वहिल्या चित्रपटासाठी साराने ‘फिल्मफेअर’ पुरस्कार जिंकला. ‘केदारनाथ’साठी बेस्ट अॅक्ट्रेस डेब्यूच्या अर्थात सर्वोत्कृष्ट पर्दापणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले. पण हा पुरस्कार जिंकल्याच्या आनंदात सारा इतकी काही भान विसरली की, ‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात ती शाहरूख खानला चक्क ‘अंकल’ बोलून गेली. होय, चक्क ‘अंकल’.
‘माझा पापा शाहरूख अंकलसोबत फिल्मफेअर होस्ट करायचे. ते पाहून मजा यायची,’ असे आपल्या भाषणात सारा म्हणाली. साराने शाहरूखला ‘अंकल’ म्हटले, खरे तर इथेच ही गोष्ट इथेच संपायला हवी होती. कारण शाहरुख यावर काहीही रिअॅक्ट झाला नाही. पण झाले उलटेच सोशल मीडियावर यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. शाहरुख बोलला नाही पण शाहरुखचे चाहते आणि साराचे फॅन यांच्यात मात्र वाक्युद्ध रंगले. साराने शाहरूखला ‘अंकल’ म्हणणे काही लोकांना जराही रूचले नाही. मग काय, ‘अंकल’ ऐवजी सारा ‘सर’ म्हणू शकली नसती का? असा प्रश्न अनेक युजरनी विचारला.