Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानने आई अमृतासोबत साजरा केला पहिला फिल्मफेअर जिंकल्याचा आनंद! पाहा फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 10:58 IST

यंदाचा फिल्मफेअर अवार्डही सारासाठी खास ठरला. कारण पहिल्याच चित्रपटासाठी साराने फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.

ठळक मुद्देसौंदर्य, परखड बोल आणि कमालीची विनम्रता यामुळे सारा कायम चर्चेत असते.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याची लेक सारा अली खानने गतवर्षी ‘केदारनाथ’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आणि तिच्या अदाकारीचे वारेमाप कौतुक झाले. सुशांत सिंग राजपूतसोबतची तिची जोडी पडद्यावर अशी काही जमून आली की, ‘केदारनाथ’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली. यंदाचा फिल्मफेअर अवार्डही सारासाठी खास ठरला. कारण पहिल्याच चित्रपटासाठी साराने फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. ‘केदारनाथ’साठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस डेब्यूच्या अर्थात सर्वोत्कृष्ट पर्दापणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले.

पहिला फिल्मफेअर जिंकल्याचा आनंद साराने आई अमृता सिंगसोबत साजरा केला. सोशल मीडियावर साराने आईसोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत साराच्या हाती फिल्मफेअर पुरस्काराची बाहुली आहे तर अमृताने मागून सााराला कवटाळलेले दिसतेय. फोटोतील मायलेकींच्या चेहºयावर आनंदही बघण्यासारखा आहे. ‘फिल्मफेअर या पुरस्कारासाठी आभार. या ब्लॅकलेडीचे चुंबन घेण्याचा आनंद काही औरच आहे. टीम केदारनाथ धन्यवाद. माझे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल आभार. जय भोलेनाथ,’ असे साराने लिहिले.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच्या रेडकार्पेटवर सारा आयवरी कलरचा लहंगा घालून दिसली. याआधीही साराने अनेक पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावलीय. पण २०१९ चा फिल्मफेअर पुरस्कार तिच्यासाठी खास ठरला.

सौंदर्य, परखड बोल आणि कमालीची विनम्रता यामुळे सारा कायम चर्चेत असते. ‘केदारनाथ’ या चित्रपटानंतर सारा रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये झळकली. पाठोपाठ तिसरा सिनेमाही तिला मिळाला. लवकरच सारा इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करेल.

टॅग्स :सारा अली खानअमृता सिंगसैफ अली खान